लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोवीडच्या काळात आपल्या सभोवतालील गावांना नेहमी सहकार्य करणाऱ्या अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन ने कोवीड लसीकरणावर भरपूर जोर दिला आहे.
त्याच अनुषंगाने तालुका आरोग्य अधिकारी कोरपना यांच्या पत्राची दखल घेत, अधिकाअधिक कोविड लसीकरण होण्याकरिता व तिस-या लाटेला नियंत्रणात आण्याकरीता अल्ट्राटेकचे व्यवस्थापक संजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १५००० ए. डी. सिरिंज तालुका आरोग्य अधिकारी यांना भेट देण्यात आल्या.
यावेळेस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल टेंभे, आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केन्द्र कवठाळा, डॉ. रामेश्वर बावणे, अल्ट्राटेकचे व्यवस्थापक कर्नल दीपक डे, सतीष मिश्रा, सचिन गोवारदीपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे उपस्थित होते.
१५००० ए. डी. सिरींज प्राप्त झाल्याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी कोरपना डॉ स्वप्नील टेंभें यांनी लेखी स्वरूपात अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन चे शतष: आभार मानले व या ए. डी. सिरींज चा उपयोग जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यास होईल असे सुद्धा त्यांनी सांगितले.