लोकदर्शन 👉
कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे
कोरपना तालुक्यातील अनेक इंग्रजी शाळा आहे कान्वेट आहेत परंतु याला बगल देत अजूनही ग्रामीण भागात नागरिकांनी जिल्हा परिषद शाळेला आपली पसंती दर्शविली आहे कॉन्व्हेन्ट शाळेला अनेक विद्यार्थ्यांनी पाठ फिरवलेली आहे श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांनी आपल्या मुलांचा जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे प्रवेश घेऊन इतर सामान्य नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत खरा विद्यार्थी घडत असतो याची जाणीव करुन दिली यावेळी हिवरकर यांचे श्री जयपाल राऊत मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा उपसरपंच कन्हाळगाव तसेच श्री जयपाल राऊत मुख्याध्यापक, श्री चौधरी सर,श्री शुक्ला सर, श्री जीवतोडे सर, श्री तेलंग सर,सौ मडावी मॅडम,सौ भगत मॅडम,श्री मनवरजी आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाने आपलं कर्तव्य समजून जिल्हा परिषद शाळेला महत्त्व दिले पाहिजे जिल्हा परिषद शाळेमध्ये शासनाच्या अनेक सोयी-सुविधा उपलब्ध असून याचा पालकांनी लाभ घ्यावा कारण कन्हाळगाव तसेच इतर जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी न्यायाधीश,तहसीलदार,पोलिस अधिकारी, डॉक्टर,नर्स,अशा अनेक मोठमोठ्या हुद्यावर आज काम करत आहे व या शाळेचा दहावीचा निकाल 95% ते 96% टक्के दरवर्षी लागत असतो या शाळेचे खास वैशिष्ट्य आहे असे मत व्यक्त केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या