पोलीस पाटलांची रिक्त पदे तात्काळ भरा

🔸उपसरपंच उमेश राजूरकर यांची मागणी

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर:-
जनता व प्रशासन यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणारे पद म्हणजे पोलीस पाटील होय कोरपना तालुक्यातील गडचांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत सात गावामधील पोलिस पाटलांची पदे गेल्या दहा वर्षापासून रिक्त असल्याने ती तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी उपसरपंच उमेश राजूरकर यांनी गडचांदूर पोलीस निरीक्षक सत्यजित आमले व आमदार सुभाष धोटे यांना निवेदनातून केली आहे
गडचांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या निमणी बाखर्डी लखमापूर नवेगाव नोकारी गोवारीगुडा बैलमपूर या गावची पोलीस पाटील पदे मागील दहा वर्षांपासून भरण्यात आली नाही ही पदे रिक्त असल्याने पोलीस पाटलांना आपल्या गावासह अतिरिक्त गावाचा पदभार असल्याने त्यांच्या समोर बरेच प्रश्न निर्माण होतात
त्यामध्ये मयत वारसांन दाखला देणे समत्ती पत्र देणे अश्या अपुऱ्या माहितीमुळे कठीण झाले आहे तसेच गावं दूर असल्याने पोलीस पाटलांना तेथील माहिती गोळा करतांना मोठी दमशॉक होत आहे तर तंटामुक्त समित्या मात्र नाममात्र राहिल्या आहे त्यामुळे ही पदे भरणे गरजेचे आहे
ही बाब लक्षात घेऊन रिक्त असलेली पोलीस पाटलांची पदे तात्काळ भरावी अशी मागणी निमणी ग्रामपंचायत उपसरपंच उमेश राजूरकर यांनी केली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *