By : Mukesh Walke
* ईको-प्रो चे मनपाला निवेदन
चंद्रपूर :
ऐतिहासिक दश मुखी दुर्गा मूर्ती संग्रहालय परिसरात चंद्रपूर शहर महानगपालिकेने डंपिंग यार्ड बनविल्याने या परिसराचे प्राचीन पुरातत्त्वीय महत्त्व कमी होऊन प्रसंगी त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची वेळ येईल. अशी गंभीर माहिती देत आज शुक्रवार दिनांक २४ सप्टेंबर ला महानगर पालिकेला निवेदन देण्यात आले. ईको-प्रो च्या महाकाली विभागाचे प्रमुख अब्दुल जावेद यांच्या नेतृत्वात सह आयुक्त पालीवाल यांची भेट घेऊन या संदर्भाने चर्चा करण्यात आली. यावेळी महिला सक्षमीकरण बांबू कलावंत मीनाक्षी वाळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
भिवापूर प्रभागा अंतर्गत येणाऱ्या माता नगर परिसरात दशमुखी दुर्गा मूर्ती संग्रहालय आहे. याच ठिकाणी रावण मूर्ती परिसरात अनेक प्राचीन पुरातत्त्वीय अवशेष आहेत. शिवाय एक दर्गा आणि हॉस्पिटल सुद्धा आहे. अश्या ठिकाणी जिथे लोकांची आणि देश विदेशातील पर्यटकांची रेलचेल असते तिथे या डंपिंग यार्ड मुळे घाण आणि दुर्गंधीने नाकी नऊ आले आहेत. डासांनी हैदोस घालून मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारात भर घातली आहे.
बांबू कलावंत मीनाक्षी वाळके यांचे म्हणणे आहे की, या परिसरात बांबूची लागवड कुंपणा सारखी करावी. बांबू ही वनस्पती सर्वाधिक कार्बन शोषून मोठ्या ऑक्सीजन देते. त्यामुळे हा परिसर पर्यावरण पूरक होईल. हिरवळ साैंदर्य वाढेल आणि बांबू तून रोजगाराच्या संधी सुद्धा वाढतील. कुंपणासारखी बांबू ची लागवड केल्याने येथे मोकाट गुरे ढोरे आणि ईतर पाळीव प्राणी येणार नाही. आज बांबूला फ्युचर मटेरियल म्हणून जगमाण्याता मिळाली आहे. बांबू पर्यटनाचे नवे दालन सुद्धा यामुळे उघडेल. त्यामुळे या ठिकाणी मनपा ने केलेल्या घाणी वर हा नैसर्गिक तसेच पर्यावरण पूरक उपाय करावा, अशी मागणी त्यांनी केली.
डंपिंग यार्ड चा परीघ कालांतराने वाढून या परिसरातील दश मुखी दुर्गा मूर्ती संग्रहालय आणि रावण मूर्ती परिसर कायमचा गडप होण्याची गंभीर स्थिती आहे. यावर तीव्र आक्षेप घेत ईको-प्रो नी आंदोलनाचा इशारा दिला आहे.