रामपूरवाशीयांसाठी फिल्टर प्लांटचे पाणी उपलब्ध करू. — नगराध्यक्ष अरुण धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

 

राजुरा :– राजुरा शहराला शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी न. प. राजुराचे फिल्टर प्लांट रामपूर येथे उभारण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून या फिल्टर प्लांटचे पाणी राजुरा शहरासाठी नवसंजीवनीचे काम करीत आहे. या फिल्टर प्लांट चे पाणी रामपूरवाशीयांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी रामपूरवाशीय नागरिकांच्या वतीने एका शिष्टमंडळाने आमदार सुभाष धोटे आणि नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्याकडे केली आहे. सोबतच सास्ती रोड ते फिल्टर प्लांट पर्यंत रोड व नाली बांधकाम करण्याबाबत सुध्दा चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी संबंधीत शिष्टमंडळाला नगरध्यक्ष अरूण धोटे यांनी सांगितले की, जगदीश बुटले, लक्ष्मी चौधरी, शितल मालेकर, रत्नाकर गर्गेलवार, प्रभाकर बघेल, कोमल पुसाटे आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी हे विषय आमदार सुभाष धोटे आणि माझ्याकडे आधीच मांडले आहेत. रामपूर येथे पाणी पुरवठा व अन्य सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात त्यांच्या मागणीवर काम सुरू आहे. आजच्या शिष्टमंडळानेही हीच मागणी केली आहे. आमदार सुभाष धोटे यांच्याशी चर्चा करुन लवकरात लवकर रामपूरवाशीयांसाठी फिल्टर प्लांटचे पाणी पुरवठा व आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी रामपूरच्या सरपंच वंदना गौरकार, उपसरपंच हेमलता ताकसाडे, ग्रा. प. सदस्य जगदिश बुटले, रमेश झाडे, विलास कोदरीपाल, सिंधुबाई लोहे, अनिता आडे, नामदेव गौरकर, बालाजी विधाते यासह रामपूरचे नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *