अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्येमुळे धर्मातील विविध 13 आखाडे एकदम चर्चेत आले यात धार्मिक मान्यता नसलेल्या 14 व्या किन्नर आखाड्याचा सुद्धा समावेश आहे ..सनातन म्हणजे हिंदू धर्मात आमची हजारो वर्षांपासून वाताहत झाली ..कुणी आमची विचारपूस करणारा अवतारही जन्माला आला नाही ..पण 2014 मध्ये मध्ये सुप्रीम कोर्टाने आम्हाला कायद्याच्या चौकटीत बसवून न्याय दिला .त्यामुळे धर्मात आपले वेगळे स्थान असावे व त्या स्थानातून आमचा मानसन्मान वाढावा यासाठी किन्नरानी 14 व्या किन्नर आखड्याला जन्माला घातले अन लक्ष्मी त्रिपाठी पहिली किन्नर महंत झाली..आता इतर तेरा आखा ड्यांचा इतिहास मात्र प्राचीन असला तरी आधी 4 आखाडे अस्तित्वात होते ..पण सत्ता मतभेदाचे कारण ठरत सनातनी आखाड्याचे संख्याबळ 13 वर पोहचले ..आखाडे म्हणजे सर्वसाधारण व्यायामाचे , मल्ल घडविण्याचे ठिकाण अशीच काहीशी ओळख ..पण सनातन धर्म बुद्ध कालखंडात संकटात येताच शंकराचार्यांनी तो टिकविण्यासाठी आखाड्यांचा वापर करून त्यांना धर्मात मान सन्मानाचे स्थान दिले ..असे सांगतात की बुद्ध धर्माचा देशांतर्गत वाढता प्रसार रोखण्यासाठी आध्यशंकराचार्यांनी आखा ड्यांचा वापर केला ..पण यातही तथ्य किती हे स्पष्ट झाले नाही ..कारण शंकराचार्यांचा जीवनकाल 8 व 9 व्या शतकातील होता पण आखड्यांचा पसारा मात्र निश्चित स्वरूपाचा नाही ..या 13 आखाड्यात काही शिवाची तर काही विष्णूची उपासना करीत असल्यामुळे त्यांच्यात जीवघेणी स्पर्धा यआहे..पण एक उदासीन आघाडा मात्र गुरू गोविंदसिंग यांच्या प्रति समर्पित आहे ..आखाडे स्वतःला हिंदू धर्माचे रक्षक स्वरूपात समजतात ..सण1954 मध्ये कुंभ मेळ्यात आखाड्यात आपसी टक्कर झाली ..आपसी टकराव या पुढे टाळावा यासाठी धर्मगुरू एकत्र बसले व आखाडा परिषदेची स्थापना झाली ..आत्महत्या करणारे महंत नरेंद्र गिरी या आखाडा परिषदेचे अध्यक्ष होते ..देशातील हजारो स्वयंघोषित साधू संन्याशाना आखाडा परिषदेची मान्यताच नाही ..याआखाडा,परिषद ही विध्यापिठाचे काम करीत असते ..त्यांचे सर्टिफिकेट ज्याच्याकडे तोच खरा साधू अन्यथा भोंदूबाबा असा नियमच आहे ..कुंभात आखड्यांचा वापर संरक्षक दला सारखा होत असतो ..त्यात नागा साधुही असतात ..काही आखाडे तलवारी ,बंदुका घेऊनही कुंभात उतरतात ..सनातनी इतिहास शोर्याचा आहे ..रामायण ,महाभारत अलीकडे स्वराज्य स्थापना म्हणजे शिवरायांना तलवारीच्या बळावरच स्वराज्य उभे करावे लागले ..राम ,कृष्णाला आम्ही देव मानले ..मोहनदास करमचंद गांधी नावाचा सबरमतीचा संत तर मला अलीकडच्या काळातील देवांचा देव महादेव वाटतो .. महात्मा ठरलेल्या या सनातन्यांच्या अहिंसक आंदोलनाने साम्राज्यावर सूर्य मावळत नसलेल्या गोऱ्याना पळवून लावले.. हे नसे थोडके..या अहिंसक देवाची गोळ्या घालून हत्या व्हावी हा भागच कमालीचा वेदनादायी आहे .
Related Posts
माँ साहेब विडी कामगार घरकुल वसाहतीत पाणी पुरवठा योजना मंजूर
लोकदर्शन 👉 मोहन भारती *सोलापूर दिनांक :- ११/०१/२०२२ :-* दक्षिण सोलापुर तालुका कुंभारी येथे बेघर महिला विडी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या माँ साहेब घरकुल वसाहतीत महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाकडून पर्यावरण मंत्री व शिवसेना…
आपला आरोग्यमंत्र !!
आपला आरोग्यमंत्र !! By÷Shankar Tadas उठून प्रभाती योगासन, प्राणायाम नियमित गृहकामे, मुखी गोड नाम मुखमार्जन रात्री आणिक सh.bकाळी औषधी मंजन किंवा निमकाडी साजेसा परिधान, स्वच्छता पाळावी गृही टापटीप, दोनदा आंघोळ करावी सकाळी न्याहारी नियमित करी…
श्री/ सौ.आनंदी अर्जुन ठाकूर शिष्यवृती योजनेचा वाटप.
उरण : (विठ्ठल ममताबादे )आषाढी एकादशीचे औचित्य साधून जनसेवेतून आनंद देणा-या वशेणीत इतिहास संपादकीय मंडळाकडून नुकताच श्री/सौ आनंदी अर्जुन ठाकूर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ गरिब गरजू मुलींना देण्यात आला. वशेणी हे गाव शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले…