लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर:- शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. आघाडी सरकारने वेळीच इंपेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर आज आमच्या ओबीसी बांधवांवर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती. धुळे नंदुरबार अकोला वाशिम व नागपूर येथील निवडणूका लागल्याने तेथील ओबीसी बांधवांना ओबीसी प्रवर्गातून निवडणुक लढवता येणार नाही हा फार मोठा अन्याय आहे असे दि. 15 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा व महानगर व्दारा आयोजित धरणे आंदोलन कार्यक्रमात बोलतांना हंसराज अहीर यांनी सांगीतले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार केवळ ओबीसी समाजासोबत आहो असा दिखावा करून राज्यातील ओबीसी समाजाची शुद्ध फसवनुकच केली. 4 मार्च 2021 रोजी या 5 जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गाचे जिल्हा परिषद सदस्य यांना अपात्र ठरविन्याच्या निर्णय जेव्हा न्यायालयाने दिला.तेव्हापासून राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस व भारतीय जनता पार्टीचे नेते वारंवार आघाडी सरकारला सांगत होते की जर राज्यातील ओबीसी चे राजकीय आरक्षण टिकवायचे असेल तर राज्यात मागासवर्ग आयोग गठित करून त्यामाध्यमातून इम्पेरिकल डेटा संकलित करावा व न्यायालयात सादर करावा कारण तसे निर्देश न्यायालयानी 13 डिसेंबर 2019 रोजी राज्य सरकारला दिलेले होते परंतु सरकारनी हेतुपुरस्सर पणे या विषयाकडे दुर्लक्ष केले व जातिनिहाय जनगणना करावी, 2011 चा डेटा केंद्र सरकारणी द्यावा अशाच प्रकारचे वक्तव्य करून आघाडी सरकारमधील मंत्री व नेते खोट्या वलगना करित बसले. आणि सरते शेवटी इम्पेरिकल डेटा च आवश्यक आहे हे लक्षात आल्यानंतर सुद्धा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याबाबत मागासवर्ग आयोगाला अधिकार दिले नाही.आणि कोणतीही एजेंसी सुद्धा याबाबत नियुक्त केली नाही. फक्त आणि फक्त ओबीसी समाजाला खोट्याआशेवर ठेवून व ओबीसी समाजाची दिशाभूल करून पद्धतशीरपणे ओबीसी समाजाला होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून बाजूला केले म्हणून ह्या सरकारचा ओबीसी समाजाच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करीत असल्याचे हंसराज अहीर म्हणाले.
या प्रसंगी चंद्रपूर ग्रामिण भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर अध्यक्ष डाॅ. मंगेश गुलवाडे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी महापौर अंजलीताई घोटेकर, अविनाश पाल, जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर ग्रामिण, ब्रिजभुषण पाझारे, नरेंद्र जिवतोडे आदींची समयोचित भाषणे झाली.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, जि.प. अध्यक्षा संध्याताई गुरणुले, विनोद शेरकी, जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर महानगर, आशिष देवतळे, मोहन चैधरी, सतिश धोटे, बबन निकोडे, केशव गिरमाजी, सुरेश केंद्रे, राजु गायकवाड, सुनिल उरकुडे, नागराज गेडाम, राजु घरोटे, रविंद्र गुरणुले, शेख जुम्मन रिझवी, भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, विवेक बोढे, उपमहापौर राहुल पावडे, अल्काताई आत्राम, ओबीसी महिला आघाडी च्या वंदनाताई संतोशवार, रेणुकाताई दुधे, अरूण मस्की, नामदेव डाहुले, राहुल संतोशवार, प्रशांत घरोटे, धनरज कोवे, किशोर गोवारदिपे, सुनिल नामोजवार, सचिन डोहे, विकास खटी नगरसेविका शिलाताई चव्हान, शितल गुरणुले, लिलावती रविदास, पुष्पा उराडे, वनिता डुकरे, कल्पना बगुलकर, पुनम गुडवा, कविता सरकार, गुडधे ताई, नगरसेवक राजेंद्र अडपेवार, सोपान वायकर, प्रशांत चैधरी, संदीप आवारी, प्रदिप किरमे, शाम कनकम, देवानंद वाढई, सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, रवि लोणकर, प्रमोद शास्त्रकार, तुशार सोम, तुशार मोहुर्ले, रामपाल सिंह, प्रविन ठेंगने आदींची उपस्थिती होती.