आमदार सुभाष धोटे यांनी जिवती येथे घेतली आढावा बैठक

लोकदर्शन👉 मोहन भारती


जिवती :– जिवती येथे तहसील कार्यालयाच्या सभागृहात आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक वितरण व्यवस्था, दक्षता समिती व अन्य विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी अन्न पुरवठा विभाग, रास्तभव दुकादार व ग्राहक यांच्यात योग्य समन्वय असणे गरजेचे आहे. गोर गरीब जनतेला रास्तभाव दुकानदार यांनी योग्य सहकार्य करावे. येणाऱ्या अडचणींचे निरसन करून नागरिकांना सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी पाऊल उचलण्यात यावीत अशा अनेक महत्त्वपूर्ण सुचना केल्या.
या प्रसंगी प.स. सभापती अंजनाताई पवार, माजी जि. सदस्य भिमराव पाटील मडावी, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणपत आडे, माजी उपसभापती सुग्रीव गोतावळे, सिताराम कोडापे, दक्षता समिती सदस्य सत्तरशाह कोटनाके, जयश्री गोतावळे, कांता श्रीसागर, रखमाबाई राठोड, शामराव गेडाम, सवित्रा गोटमवार, कलीम शेख, तहसीलदार ए.बी. गांगुर्डे, मुख्यधिकरी कविता गायकवाड, पुरवठा अधिकारी निरीक्षक सविता गंभीर, सहायक निरीक्षक प्रमोद मेश्राम, तालुका युवक अध्यक्ष सिताराम मडावी, बालाजी गोटमवार, रास्तभाव दुकानदार, नागरीक उस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *