लोकदर्शन👉 मोहन भारती
🔶वृद्धाश्रमात केले फळवाटप
गडचांदूर:-(
प्रत्येकाजवळ चार पैसे जमा झाले की ते कसे खर्च करायचे असा हरहुन्नरी मार्ग शोधत असतात वाढदिवस साजरा करणे म्हणजे फॅशन झाली आहे मग यासाठी कितीही खर्च झाला तरी चालेल पण या खर्चाला फाटा देऊन गडचांदूर येथील सामाजिक कार्यकर्ते आशिष वांढरे यांनी डेबू सावली वृद्धाश्रमात व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे स्वतः रक्तदान करून साजरा केला
वाढदिवसाला होणार खर्च वृद्धाश्रमात देऊन सर्व वृद्धांना अल्पोहार व फळे वाटप करण्यात आल्याने आशिष वांढरे यांचे कौतुक होत आहे मोठं मोठे हॉटेल धाब्यावर पार्टीचे नियोजन करून वाढदिवस साजरे करताना पहायला मिळते यांवर लाखो रुपयांची उधळपट्टी होतात यालाच बगल देत आशिष वांढरे यांनी वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करण्याचे ठरविले
संपूर्ण दिवस वृद्धांनसोबत घालवूनघालवून त्यांच्या दुःखावर फुंकर घालून आनंदी वातावरण निर्माण केले यावेळी सेवा निवृत्त प्राध्यापक दिवाकर खाडे धिडसी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोरडे जेष्ठ नागरीक राजू निखाडे ब्रहुस्पती पवार डेबू सावली येथील वृद्ध मंडळी उपस्थित होते.