By : Shivaji Selokar
भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या वतीने ३० ऑगस्टला शंखनाद आंदोलन
धार्मिक संघटनांच्या शंखनाद आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा
गडचिरोली ,चामोर्शी व धानोरा तालुका केंद्रावर होणार आंदोलन
दिनांक २९ ऑगस्ट २०२१ गडचिरोली
राज्यात दारूचे दुकान सुरू करण्यात आले. परंतु अजून पर्यंत मंदिराचे दरवाजे उघडण्यात आलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर राज्यातील मंदिरे सुरू व्हावीत याकरिता धार्मिक संघटनांनी शंखनाद आंदोलन करण्याचे ठरवले आहे.या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा पूर्ण पाठिंबा असून भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या वतीने ३० ऑगस्टला आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या प्रसिद्धी पत्रकांच्या माध्यमातून दिली आहे.
देशातील इतर राज्यात मंदिरे सुरू झालेले आहेत परंतु स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या ठाकरे सरकारने राज्यात अजून पर्यंत मंदिराचे दरवाजे उघडलेले नाहीत. मंदिराच्या माध्यमातून अगरबत्ती विकणारा ,फुल विकणारा, रिक्षा चालक, गाडी वाहक अशा लाखो लोकांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे. मात्र कोरोणाचे कारण सांगून अजून पर्यंत मंदिर सुरू करण्यात आली नसल्याने अशा लोकांवर उपासमारीची पाळी आली आहे. परंतु ठाकरे सरकारला त्याची कोणतीही काळजी नसल्याचे दिसून येत आहे .त्यामुळे झोपलेल्या ठाकरे सरकारला जागवण्यासाठी व मंदिराचे दरवाजे लवकरात लवकर उघडावे याकरिता धार्मिक संघटनांनी शंखनाद आंदोलनाचे आयोजन केले आहे. या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिलेला असून गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी, गडचिरोली धानोरा या तीनही तालुक्यावर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले असून या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.