By : Mohan Bharti
राजुरा — प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करावी याकरिता गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांना विविध समस्या व मागणीबाबत निवेदन देण्यात आले. रवी भवन नागपूर येथे झालेल्या बैठकीत आमदार ऍड. अभिजित वंजारी व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते .एक तास झालेल्या बैठेकीत चर्चेमध्ये ना.उदय सामंत यांनी निवेदनातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली व सर्व प्रश्न त्वरित निकाली काढण्याचे संघटनेला आश्वासन दिले आहे. निवेदनामध्ये खालील मागण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे बिगर नेट-सेट प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नाविषयी सकारात्मक तोडगा काढून त्यांना प्रथम नियुक्ती दिनांकापासून कॅसचे लाभ देण्यात यावे, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक या पदाच्या पदोन्नती करता प्लेसमेंटची देय तारीख ग्राह्य धरण्याबाबत , प्राध्यापकांना यूजीसीच्या निर्देशानुसार टेबल-4अ प्रमाणे नोशनल वेतनवाढ देण्यात यावी. सातव्या वेतन आयोगात एम.फिल व पी.एचडी च्या प्रोत्साहनपर आगाऊ वेतनवाढी सहित वेतन निश्चिती करण्याबाबत, एम. फिल धारक प्राध्यापकांना पदोन्नती तसेच वेतनवाढीचा लाभ देण्याबाबत, 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्याबाबत, तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे अकॅडमीक स्टॉप कॉलेजची व सहसंचालक (उच्च शिक्षण) यांच्या कार्यालयाची स्थायी स्वरूपामध्ये निर्मिती करणे इत्यादी बाबत सविस्तर मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे मार्गदर्शक डॉ. प्रदीप राव घोरपडे यांचे नेतृत्वात संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ.संजय गोरे, सचिव प्रा.डॉ. विवेक गोरलावार, कोषाध्यक्ष प्रा.डॉ. जनार्दन काकडे, उपाध्यक्ष डॉ.सुनील नरांजे, डॉ.विजय वाढई,डॉ. नंदाजी सातपुते,डॉ.राजू किरमीरे, सहसचिव डॉ. सतीश कन्नाके ,डॉ. प्रमोद बोधाने,सिनेट सदस्य डॉ प्रशांत ठाकरे,डॉ. अक्षय धोटे प्रा.रुपेश कोल्हे,प्रसिद्धी प्रमुख प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी ना. उदय सामंत यांना उपरोक्त समस्या बाबतचे निवेदन दिले आहे.