BY 👉Shivaji selokar
*🔶बैठक सकारात्मक, व्यवस्थापनाव्दारे मागण्या मान्य*
गडचांदूर,
दालमिया व्यवस्थापनाने पुर्वीच्या मुरली सिमेंट उद्योगातील उर्वरीत कामगारांना अविलंब सामावून घ्यावे, कार्यालयीन वर्गातील उर्वरीत कर्मचाऱ्यांना सेवा बहाल करावी, कामगारांना त्यांची कार्यक्षमता व अनुभवाच्या आधारावर देऊ केलेल्या वेतनात सुधारणा करून त्वरीत न्याय द्यावा. ओ अॅन्ड एम मध्ये समान सूविधा उपलब्ध करण्यास त्राुटी दुर करून त्यात सुधारणा करण्यात यावी. पॅकींग प्लाॅट मध्ये पुर्वीच्या मुरली कामगारांना आवश्यकतेनुसार प्राधान्य देण्यात यावे यासह अन्य मागण्या पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी दालमिया व्यवस्थापनास चर्चेदरम्यान केल्या.
गडचांदुर येथील एरीगेशन विश्रामगृहात दि. 21 आॅगस्ट रोजी नारंडा सिमेंट कामगार संघटना व दालमिया व्यवस्थापनाची बैठक हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कामगार संघटनेकडुन खुशाल बोंडे, राजु घरोटे, देवराव निंदेकर, वासुदेव बेसुरवार, साईनाथ सोनटक्के, दिपक भोस्कर, नथ्थुजी बोबडे, सुनिल जीवने, विलास टोंगे यांनी तर व्यवस्थापनाच्या वतीने अली,भुसारी ,कोल्हटकर, पामपट्टीवार,यांनी प्रतिनिधीत्व केले. या बैठकीत चर्चेदरम्यान पूर्व गृहराज्यमंत्राी महोदयांव्दारे सुचविलेल्या सर्वच मागण्यांबाबत अविलंब अंमलबजावणी केली जाईल असे व्यवस्थापनाने कामगार प्रतिनिधीच्या उपस्थितीत मान्य केले.
मुरलीच्या अधिकांश पूर्व कामगारांना न्याय मिळाला असुन जे कामगार रूजु होण्यास तयार नाही अशा कामगारांना वगळुन उर्वरीत कामगारांना त्यांच्या पूर्वीच्या विभागातच त्यांच्या शिक्षण व अनुभवानुसार पुनर्नियुक्ती द्यावी, ठेकेदारी कामगारांना नियमित काम मिळण्यासाठी मागणी अहीर यांनी केली. या बैठकीत कामगारांच्या न्यायविषयक बाबींवर सकारात्मक चर्चा झाल्याने कामगारांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.