लोकदर्शन 👉 मोहन भारती
=गडचांदुर ===
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती व स्वरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे संस्थापक सचिव स्व. हरिभाऊ डोहे गुरुजी यांची पुण्यतिथी सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर, शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर, सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कुल गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच साजरी करण्यात आली.
शरदराव पवार महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आनंदराव अडबाले होते. विशेष अतिथी म्हणून गडचांदूर नगर परिषद अध्यक्षा सौ सविताताई टेकाम, डॉ ,के,आर,भोयर तर प्रमुख अतिथी म्हणून तुळशीरामजी पुंजेकर, नामदेवराव बोबडे, विनायकराव उरकुडे,नोगराज मंगरुळकर, माधवराव मंदे, श्रीमती नलुताई डोहे, प्राचार्य धर्मराज काळे, प्राचार्य डॉ संजयकुमार सिंह,सेवानिवृत्त प्रा प्रदीप बोबडे, मुख्यध्यापिका कु व्ही डी गुळधे,मुख्याध्यापक बी ए उलमाले, मुख्याध्यापक व्ही वाय हेपट इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांनी भारतरत्न राजीव गांधी व संस्थेचे संस्थापक सचिव स्व हरिभाऊ डोहे गुरुजी यांच्या कार्य कर्तृत्वावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आनंदराव अडबाले यांनी अध्यक्षीय भाषणातून राजीव गांधी यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेत संस्थेचे संस्थापक सचिव हरिभाऊ डोहे गुरुजी यांनी संस्थेच्या स्थापनेसाठी आणि प्रगतीसाठी केलेल्या त्याग व संघर्षाची माहिती देत त्यांच्या प्रेरणेतून कार्य करीत संस्थेची उत्तरोत्तर प्रगती करणे हीच डोहे गुरुजींना खरी आदरांजली ठरेल असे याप्रसंगी विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी प्राचार्य डी आर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या कुंडी प्रकल्पाचे उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रा डी के झाडे यांनी केले. त्याच बरोबर कोरोना काळात सामाजिक दायित्वाच्या भावनेतून कार्य करणारे विद्यालयाचे लिपिक लीलाधर मत्ते यांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रारंभी राजीव गांधी व स्व हरिभाऊ डोहे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
कोविड नियमांचे पालन करीत आयोजित करण्यात आलेल्या सदर मुख्यकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत खैरे यांनी केले. तर प्रास्ताविक पर्यवेक्षक संजय गाडगे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. सोज्वल ताकसांडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
,,फोटो,,
==========V===================