भारतीय स्वातंत्र्या च्या 74 वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला श्री व्यंकटेश बहुउद्देशीय संस्था चे कोषाध्यक्ष श्री दीपक महाराज पुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सदर कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी शेख रहुफ शेख चमन सचिव, मोहन भारती सहसचिव, विश्वनाथ देशमुख, नानासाहेब देशमुख, विठ्ठल महाराज पुरी, रंगनाथ देशमुख सर्व संचालक मंडळ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांच्या उपस्थित ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून काही कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यात महाविद्यालयीन कर्मचारी अनिल नळे, व्यंकटी वाकळे प्रा. गजानन राऊत यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्या बद्दल गौरविण्यात आले, तसेच प्रा. श्रीकांत पानघाटे यांनी रातूम नागपूर विद्यापीठाची संत तुकाराम च्या सर्वांगीण कार्य यावर आचार्य पदवी प्राप्त केली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तर जिवती परिसरात नक्षलवादी कार्यवाहीत शहीद झालेल्या स्व. सूर्यभानजी शिंदे यांच्या पत्नी श्रीमती रेणुकाताई शिंदे यांचा सुद्धा शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारे वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. देशमुख सर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाते तर प्रा. तेलंग सर, प्रा. लांडगे सर, मंगाम, वासाडे, मुंडे, साबळे, मस्कले यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..
Related Posts
ई-पीक पाहणीबाबत काही भागांतून तक्रारी
लोकदर्शन👉 मोहन भारती दिनांक : 15-Sep-21 पुणे : आपल्या शेतातील पिकाची नोंद स्वतः शेतकऱ्यानेच करण्याची सुविधा देणाऱ्या ई-पीक पाहणीच्या विरोधात काही भागांतून तक्रारी येत आहेत. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही थेट मुख्यमंत्र्यांना पत्र देत…
आज 8 मार्च : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून…जगप्रसिद्ध स्त्रीवादी महिलांचे धाडसी विचार
लोकदर्शन संकलन -👉 साहेबराव माने. पुणे. 9028261973. 8 मार्च 2022. स्त्री-पुरुष समानतेच्या सशक्त टप्प्यावर आपण पोहोचलो आहोत, असं म्हणणं धाडसाचं ठरेल. कारण, लिंग समानतेचा मार्ग आणि त्यातील बदल सतत होत असतात. वंश, वर्ग, लिंग…
तहसीलदार प्रशांत बेडसे ठरले महसूल विभागाचे ‘आयकॉन’
By : Rajendra Mardane वरोरा : आपले प्रशासकीय कौशल्य पणाला लावत विविध समाजोपयोगी नावीन्यपूर्ण योजना यशस्वीरीत्या अमलात आणून पाच महिन्याच्या अल्पावधीत शासनाला जवळपास ३.५ कोटी रुपयाचे रेकॉर्डब्रेक उत्पन्न मिळवून देणारे तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील महसूल…