लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– दिनांक ३ आँगस्ट २०२१ रोजी इयत्ता दहावी सीबीएसई बोर्डाच्या जाहीर झालेल्या निकालात इन्फट जिसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुराच्या विद्यार्थ्यांनी भरीव कामगिरी करीत बाजी मारली आहे. या वर्षीच्या निकालात पुन्हा एकदा १०० टक्के निकाल देण्याची परंपरा इन्फटने कायम राखली आहे.
यात कु. आस्था गोरे आणि कु. शृती पुणेकर या दोघींनी ९५. ४० % गुण घेऊन इन्फट कान्वेंट मधून संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कु. पुनम कोरडे ९४. २० % आणि कु. पुर्वा शदारपवार ९०. ६० % यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला आहे. शैक्षणिक सत्र सन २०२०-२०२१ या वर्षी इयत्ता दहावी सीबीएसई च्या परिक्षेसाठी एकूण ३७ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी सर्व ३७ विद्यार्थी उत्तम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे ४ विद्यार्थी मेरीट मध्ये, १६ विद्यार्थी डिस्टींक्शन मध्ये, ९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ७ विद्यार्थी द्वितीय क्षेणीत तर १ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या कामगिरी व यशाबद्दल विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वृंदांचे आमदार तथा इन्फट जिसस सोसायटीचे अध्यक्ष सुभाष धोटे, नगराध्यक्ष तथा संस्थेचे सचिव अरुण धोटे, शाळेचे संचालक अभिजित धोटे, रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, प्राचार्य समीर पठाण, सीबीएसई शाखेच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, स्टेट शाखेच्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, आदींनी अभिनंदन केले आहे.