लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– दिनांक ३ आँगस्ट २०२१ रोजी इयत्ता बारावी स्टेट बोर्डाच्या जाहीर झालेल्या निकालात इन्फट जिसस ज्युनियर कॉलेज राजुराच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून काॅलेजने १०० टक्के निकाल दिला आहे.
यात कु. रूक्मीनी अजय बतकमवार ने ८७.६६ % गुण घेऊन इन्फट जिसस ज्युनियर कॉलेज मधून प्रथम क्रमांक पटकावला आहे. कु. दरक्षा शेख ८६.६६ % गुण घेऊन द्वितीय व प्रिया अमित जोरा ८५. ६८ % गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला आहे. शैक्षणिक सत्र सन २०२०-२०२१ या वर्षी इयत्ता बारावी स्टेट बोर्ड च्या परिक्षेसाठी एकूण ३७ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी सर्व ३७ विद्यार्थी उत्तम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे ३० विद्यार्थी डिस्टींक्शन मध्ये तर ७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या कामगिरी व यशाबद्दल विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी वृंदांचे आमदार तथा इन्फट जिसस सोसायटीचे अध्यक्ष सुभाष धोटे, नगराध्यक्ष तथा संस्थेचे सचिव अरुण धोटे, शाळेचे संचालक अभिजित धोटे, रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, इन्फंट जिजस ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य समीर पठाण, कल्याण नर्सिंग काँलेजच्या प्राचार्या पुजा गीते, इन्फंट कान्व्हेंट च्या मुख्याध्यापक मंजुषा अलोने, सिमरनकौर भंगू, रफिक अन्सारी आदींनी अभिनंदन केले आहे.