— लोकदर्शन 👉महेश गिरी नागपुर
*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन( NGP 5704)* ची नागपूर शहर सहविचार सभा
विवेकानंद विद्यालय, शेष नगर नागपूर. येथे आज दिनांक 2 ऑगस्ट 2021 रोजी सोमवारला संपन्न झाली. सभेच्या अध्यक्ष स्थानी सदर संघटनेचे राज्य अध्यक्ष *श्री.शिवराम घोती सर* , प्रमुख मार्गदर्शक, राज्य कोषाध्यक्ष *श्री.गजानन टांगले सर,* प्रमुख पाहुणे, *श्री. *तेजराम बंगडकर सर* ( राज्य सल्लागार), नागपूर विभागीय अध्यक्ष *श्री.यशवंत कातरे सर* , नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष *श्री. महेश गिरी* सर जिल्हा कोषाध्यक्ष *केशवानंद बमनोटे सर* हे उपस्थित होते.
सभेमध्ये नागपूर शहर कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. माननीय राज्याध्यक्ष *श्री. शिवराम घोती सर* , यांनी *नागपूर शहर अध्यक्ष श्री. देविदास इटनकर सर*, *श्री. देविदास येलुरे सर यांना शहर सचिव, श्री. विशाल बोरकर सर यांना शहर कार्याध्यक्ष, श्री. राजेंद्र लांजेवार सर यांना कोषाध्यक्ष, श्री. लक्ष्मीकांत बांते सर यांना सहकोषाध्यक्ष,कार्याध्यक्ष श्री. प्रवीण दांडेकर सर यांना मुख्य संघटक, सौ. स्वाती साखरे मॅडम महिला आघाडी प्रतिनिधी, श्री. रुपेश बावनकर सर यांना प्रसिद्धी प्रमुख, श्री. विनोद दाढे सर यांना सहसचिव, श्री. पुरुषोत्तम पुरी सर यांना संघटक, **श्री. निलेश बादुले* सर यांना संघटक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली.
नागपूर जिल्हा कार्यध्यक्ष म्हणून *श्री. महेश गिरी* सर यांची नियुक्ती करण्यात आली.
सभेत राज्य कोषाध्यक्ष *श्री.गजानन टांगले सर* यांनी संघटनेचे महत्व आणि संघटनेची कार्यप्रणाली कशी राहील यांची माहिती सविस्तर दिली ,तसेच जुनी पेंशन आपल्याला मिळु शकते अशी माहिती राज्य अध्यक्ष *श्री शिवराम घोती* यांनी दिली. त्यांनी घटनात्मक द्रुष्ट्या राज्य सरकारने लावलेली DCPS आणि NPS कशी चुकीचे आहे हे सर्व कर्मचाऱ्यांना पटवून दिले. जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच NPS सहा महिन्यात स्वतः राज्यसरकार बंद करण्याची घोषणा करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विवेकानंद विद्यालयाचे पर्यवेक्षक *श्री. राजुभाऊ रेवतकर सर* यांनी मार्गदर्शन केले. तसेच तन मन धनाने संघटनेच्या पाठीशी राहील असे आश्वासन दिले. सभेचे सुत्र संचालन *श्री. देविदास इटनकर सर* यांनी केले तर आभार प्रदर्शन *श्री. लक्ष्मीकांत बांते सर* यांनी केले.
सभेमध्ये वरिष्ठ व निवड श्रेणी, NPS, DCPS योजना यावर चर्चा करण्यात आली. सभेला *श्री. देविदास येलुरे सर, श्री. लिकेश बादुले सर, श्री. विनोद खोडके सर, श्री. अनिल राठोड सर, कु. ज्योती गजभिये मॅडम, सौ. राजकन्या बागडे मॅडम, सौ. स्वाती साखरे मॅडम, सौ. श्यामल मानेकर मॅडम, श्री. चंद्रशेखर बाराई सर, श्री. प्रवीण भोगे सर, श्री. आशिष तिडके सर,श्री. प्रमोद येरगुडे सर, श्री. विशाल बोरकर सर, डॉ. पुरुषोत्तम पुरी सर , सौ. संगीता काळे मॅडम, सौ. अरुणा फसाटे मॅडम, श्री. राजेंद्र लांजेवार सर, श्री.सतीश राठोड सर, श्री.निलेश शिंदे सर, श्री राधेश्याम निनावे सर, श्री लक्ष्मीकांत बांते सर, श्री एस. डी. बतकी सर, श्री. अनिल हिंगणकर सर, श्री. दिलीप तळहांडे सर*. तसेच नागपूर शहरातील शिक्षक, शिक्षीका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
——————————