लोकदर्शन 👉 मोहन भारती
महसूल दिनी आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते शेणगाव व नंदप्पा येथील तलाठी कार्यालयाचे लोकार्पण.
जिवती (ता.प्र) :– महसूल दिनाचे औचित्य साधून तहसील कार्यालय जिवती अंतर्गत शेणगांव आणि नंदप्पा येथील तलाठी कार्यालयाचे लोकार्पण आमदार सुभाष धोटे यांचा हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना आमदार सुभाष धोटे सांगितले की राजुरा विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामाचे उद्घाटन आणि लोकार्पण सुद्धा माझ्या हस्ते होऊन राहिले हे सर्व मायबाप मतदार बंधुंमुळेच मला सौभाग्य प्राप्त झाले आहे. नवीन कार्यालयातून तलाठ्यांनी गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी झटावे. आपले कार्य निस्वार्थपणे करून जनतेच्या समस्या सोडविण्यास विशेष प्राधान्य द्यावे. आज महसूल दिनी या कार्यालयांचा शुभारंभ होत आहे ही आनंदाची बाब आहे. महसूल कार्यालयासाठी १ ऑगस्ट ते ३१ जुलै असा कार्यकाल गनला जातो. तलाठ्यांनी प्रत्यक्षात गावा गावात जाऊन शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करावे तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करावे अशा सूचना देखील त्यांनी या प्रसंगी केल्या. शासनाचे सर्व काम हे ऑनलाईन पद्धतीने झालेले असल्यामुळे आणि जिवाती तालुक्याला नेटवर्क उपलब्ध नसल्याने येथे अनेक अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन कालच जिल्यातील दिशा बैठकीत नेटवर उपलब्ध करण्यासाठी जीवती तालुक्यात कुंभेझरी, कोदेपुर, शेणगाव, वणी या ठिकाणी उत्तम नेटवरचे टावर उभारण्यात यावेत अशा सुचना संबंधित विभागाला केल्या आहेत. येत्या दोन- तीन वर्षात येथे हे काम पूर्ण होईल. जिवती तालुक्यात पाण्याचा प्रश्न खूप असतो पण दोन चार वर्षात हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक गावाला नळ योजना करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते १० लाभार्थींना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत प्रत्येकी २० हजार रुपयाचे धनादेश देण्यात आले. १३ लाभार्थींना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले, १४ लाभार्थींना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले, तसेच मतदार ओळखपत्र २१ लाभार्थ्यांना देण्यात आले.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार अमित बनसोड, पंचायत समिती सभापती अंजना पवार, माजी जि प सदस्य भीमरावपाटील मडावी, तालुका युवक अध्यक्ष तथा उपसरपंच सिताराम मडावी, अध्यक्ष तालुका महिला काँग्रेस कमिटी नंदाताई मुसणे, माधव डोईफोडे, शंकर कांबळे, ताजुद्दीन शेख, देविदास साबणे, अजगर आली, भीमराव पवार, दत्ता माने, प्रल्हाद राठोड, दिगंबर पोले, बंडू राठोड, पंढरी मस्कले, सुभाष मस्कले, नायब तहसीलदार गेडाम, उपविभागीय अभियंता मिश्रा सर, कनिष्ठ अभियंता शिंदे, जिवती तालुक्यातील तलाठी पत्रकार ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते.