लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*लोकनेते विकास पुरुष आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा राजुरा तालुका तर्फे कढोली बु.येथे कोरोना योद्धा सत्कार व वृक्षारोपण संपन्न*
भारतीय जनता पार्टी तालुका राजुराच्या वतीने कोरोना महामारी मध्ये जीवाची पर्वा न करता,दिवस रात्र जनतेच्या सेवेत कार्य करणाऱ्या डॉक्टर,आशावर्कर,सफाई कामगार,या कोरोना योद्धाचा सत्कार माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या पुढाकारातून राजुरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली बु.कोरोना योद्धाचा सत्कार समारंभ व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला,कार्यक्रमा प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून,तसेच आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.यावेळी सर्व आरोग्य कर्मचारी यांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व भेट वस्तू देण्यात आले,
यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे बोलताना सांगितले की, दूरदृष्टी शब्दाला जागणार नेता मनुन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ओळख संपूर्ण महाराष्ट्रात असून,त्यांनी दिलेला शब्द हा नेहमी खरा ठरत,त्यांच्या काम करण्याची पद्धत मी आमदारकीच्या काळात बघितले असून,कोणत्याही कामत पुर्ण पूर्ण मन लावून ते करत असते,भाजपा सरकारच्या काळात त्यांच्या माध्यमातून राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक कामे मार्गी लागले असून यापुढेही त्यांच्या हातून संपूर्ण महाराष्ट्राचा सह चंद्रपूर जिल्ह्याचा विकास होईल अशी आशा करतो,त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून सदिच्छा देतो.यावेळी
कार्यक्रमा प्रसंगी माजी आमदार अँड संजय धोटे यांच्यासह जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे,पंचायत समिती सदस्य संजय करमरकर,नगरपरिषेदेचे सभापती राधेश्याम अडाणीया,वैद्यकीय अधिकारी डॉ.विपीन ओदेला,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,भाजपा तालुका महामंत्री प्रशांत घरोटे,संजय उपगनलावार,कढोली बु येथील सरपंच राकेश हिंगाने,भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे,भाजपा नेते महादेव तपासे,गणेश रेकलवार,धीडशी गावचे सरपंच कुमारी रिता हनुमंते,पोवणीचे सरपंच सरला फुलझले,धिडशी गावचे उपसरपंच राहुल सपाट,उपसरपंच सविता पडवेकर,डॉ रविना गोरे,डॉ शिलकुमार दुधे,कु डॉ मीरा वजीर,डॉ ए ए बूरलावार,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर,रामस्वामी रावला,राजू निषाद,रत्नाकर पायपरे,संदीप मडावी शत्रूघन पेटकर,राहुल ढुमने आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशवीसाठी आरोग्य कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले,