, लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ,गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय गडचांदुर येथे इय्यता दहावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 20 जुलै ला करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ,गडचांदूर चे ज्येष्ठ संचालक श्री विठ्ठलराव थिपे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी सचिव श्री.धनंजय गोरे, संचालक श्री.रामचंद्र सोनपितरे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता चिताडे, उपमुख्याध्यापिका श्रीमती शोभा घोडे, पर्यवेक्षक श्री अनिल काकडे तसेच पालक व शिक्षक उपस्थित होते. रमाकांत संजय ठाकरे हा विद्यार्थी 95.20% घेऊन तालूक्यात व शाळेतुन प्रथम आला ,अमन दिलीप नागरीकर द्वितीय, कु.अष्टमी तिरुपती मुंडे तृतीय आली या आणि काही निवडक विद्यार्थ्यांचा या प्रसंगी पुष्पगुच्छ व गुणपत्रिका देऊन पालकांसोबत सत्कार करण्यात आला. शाळेच्या निकालात 9 विद्यार्थी 90% च्या वर गुण प्राप्त केले, एकूण 104 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले .जिवनात यश संपादन करायचे असेल तर नकारार्थी विचारांना थारा देऊ नका असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. विठ्ठलराव थिपे यांनी व्यक्त केले.प्रमुख अतिथी संस्थेचे प्र.सचिव श्री.धनंजयजी गोरे यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्या करीता शुभेच्छा दिल्या.आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो असे वक्तव्य प्रमुख अतिथी मुख्याध्यापिका सौ.स्मिता चिताडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका श्रीमती शोभा घोडे यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन श्री.शामकांत पिंपळकर यांनी केले व आभार संतोष मुंंगुले यांनी मानले.