*ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीची केली पाहणी*
तत्कालीन भाजप सरकारच्या कार्यकाळात माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या पुढाकाराने ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकाम करण्याकरिता मंजुरी मिळाली होती,इमारतीचे भूमिपूजन तत्कालीन आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते पार पडले होते, परंतु इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून ती इमारत जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कडे केली आहे, विरुर स्टेशन हे राजुरा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असून तसेच तेलंगणा सीमेवरील लगत असलेले गांव असून,परिसरात अनेक गावाचा विरुर स्टेशन या गावाचा संपर्क येतो, या गावात मोठी बाजारपेठ सुध्दा आहे,
विरुर स्टेशन तसेच परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासून होत असलेली मागणी लक्षात घेता,राजुरा विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार अँड संजय धोटे यांनी ही बाब माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात आणून दिली व राजुरा विधानसभा क्षेत्रातील चार ग्रामीण रुग्णालयच्या इमारतीला मंजुरी मिळवून दिली त्यापैकी विरुर स्टेशन येथील इमारत पूर्णत्वास आली, कोरोना महामारी होणारी रुग्णाची गैर सोय तसेच परिसरातील लोकांनां आरोग्य विषयी होणारी अडचण लक्षात घेता,ही इमारत लवकरच जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात यावी,याप्रसंगी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी इमारतीची पाहणी केली,तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा लवकर भरण्याची मागणी केली.
यावेळी माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या सह भाजपचे जेष्ठ नेते सतीश कोमरपल्लीवार,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे,भाजपचे शहर अध्यक्ष भीमराव पाला,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,ग्रामपंचायत उपसरपंच श्रीनिवास ईलदुला,ग्रामपंचायत सदस्य मोतीराम दोबला,शहर सचिव शामराव कस्तुरवार,सोशल मिडिया संयोजक हितेश गाडगे,सुरेश चिलका,प्रदीप पाला,रंदीप पाला,दिनेश कोमरपल्लीवार आदी उपस्थित होते.