लोकदर्शन By ÷ Shivaji Selokar
*खाजगी एजंसीला नियमबाह्य पीएमसी देवून भ्रष्टाचार केल्याचा आरोप.*
*दिलेली पीएमसी रद्द करा,
* थेट मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्र्यांना तहसीलदार मार्फत निवेदन.*
गडचांदूर:- कोरपना तालुक्यातील गडचांदूर नगरपरीषद अंतर्गत १४ वित्त आयोग फंडातून शहरातील ओपन स्पेसच्या संरक्षण भीतीचे व सौंदरीकरण तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सौंदरीकरणाची कामे सुरू आहे.सदर कामे अंदाजे ३ ते ४ कोटींचे असून काही कामांचा श्रीगणेश झालं तर काही लवकरच सुरू होणार असल्याचे चित्र आहे.सदर कामाची देखरेख,मोजमाप व कामाचा दर्जा पाहण्याची जबाबदारी सिव्हील कामांचा अनुभव नसलेले न.प.आरोग्य विभाग प्रमुख,मेकानिकल इंजिनीअर स्वप्निल पिदूरकर यांना सोपविण्यात आली होती.मात्र यांच्याकडून दर्जेदार कामे करवून घेता येणार नाही.किंवा त्या कामांचे मोजमाप यांच्याकडून योग्य पद्धतीने होणार नाही.त्यामुळे न.प.ची मोठी आर्थिक नुकसानीची शक्यता नाकारता येत नसल्याने सदर कामे सिव्हिल इंजिनीअरकडे देण्याची मागणी विरोधी पक्षाचे भाजप नगरसेवक अरविंद डोहे यांनी केली होती.मात्र मुख्याधिकारी व विभागप्रमुख यांचे साटेलोटे असल्याने सदरची मागणी फेटाळून लावल्याचे आरोप या नगरसेवकांनी केले आहे.
सदर कामे मेकॅनिकल इंजिनीअरकडून काढून सिव्हील इंजिनीअरकडे देण्याची मागणी आपणाकडे करण्यात आली होती.मात्र याची माहिती मुख्याधिकारी यांना कळताच यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न करून रवी पचारे यांना खोटी पीएमसी दिली.सभागृहाचा ठराव न घेता व न.प.कडे सिव्हील इंजिनीअर उपलब्ध असतानाही सभागृहाला अंधारात ठेवून केवळ अमाप पैसा कमविण्याच्या हेतूने आणि अधिकार नसताना १६ मार्च २०२० रोजी खाजगी आर्किटेक रवी पचारेंना पीएमसी दिली आहे.त्यामुळे त्या पीएमसी धारकास न.प.ला अंदाजे ७ ते ८ लाख मोजावे लागणार आहे.यामुळे न.प.चा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे ओपन स्पेसची कामे करण्याचा ठराव सर्वसाधारन सभा दि.१६/३/२०२० ला झाला. ठरावाची प्रोसेडींग तयार नव्हती तर त्याच दिवशी रवि पचारे यांना पीएमसी देण्याची घाई का केली ? असा प्रश्न उपस्थित करत विकास कामे लवकर व्हावे असा उद्देश म्हणावे तर अंदाजपत्रक बनवणे,तांत्रीक व प्रशासकिय मंजूरी प्राप्त तारीख,निविदा सादर,निविदा ओपन करणे व दर निश्चीत तारीख तसेच कामाच्या कार्यदेशाची तारीख बघीतल्यास यात फार वेळ घालवल्याचे लक्षात येते असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच पाणी टाकी बांधकामाची पीएमसी एमजीपीला देण्याची गरज असताना तसेच न.प.च्या सिव्हील इंजिनीअरकडे न देता त्या कामाची देखरेख,मोजमाप करण्याची जबाबदारी यांच्या निकटवर्ती,विश्वासू मेकॅनिक इंजिनीअर पिदुरकर यांंना दिली.आणि यांनी अतिशय दर्जाहीन काम करून अमाप पैसा कमविला.त्या कामाची एमबी पिदूरकर यांनी बनवली आणि ती मान्य करत नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी ठेकेदाराला देयक देण्यात आले.यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे.त्याची वेगळी तक्रार करण्यात आली असून त्याची योग्य चौकशी होण्याची गरज असल्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच ग्रिन जीमचे अंदाजपत्रक संगनमताने फुगवून तयार करून निविदा प्रसिध्द करण्यात आल्या.तेव्हा एकुन ४ बिट आले.त्यापैकी भुषण ईटनकर याच्याकडून इतर व्यक्तीच्या नावाने तीन बिट भरण्यात आले व यांचे व्यतीरीक्त एक वेगळी निविदा आली.त्याचे कागदपत्र अटी,शर्तीनुसार योग्य असताना जाणूनबुजून अपात्र ठरविले व इतर लोकांचे कागदपत्र अटी,शर्तीनुसार योग्य नसताना त्यांच्या निविदा पात्र ठरविल्या व ईटनकर यांना काम मिळवुन देण्यास सहकार्य केले.त्यामुळे कमी दरात होणारे काम केवळ ०.१० टक्क्यात दिले.त्यात सुध्दा स्वतःचा स्वार्थ साधून न.प.चे मोठे नुकसान केले.याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे.गडचांदूर न.प.येथे मागील ३ वर्षांपासून मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी तर स्वप्निल पिदूरकर हे आरोग्य,पाणी पुरवठा विभागप्रमुख म्हणून लाभलेले आहे.या दोघांकडे काही काळ कोरपना,जीवती न.प.चा अतीरीक्त चार्ज होता व आता गोंडपिपरी न.प.चा अतीरीक्त चार्ज यांच्याकडे आहे.या दोघांनी संगनमत करून मोठी माया गोळा केली असून त्याची सुद्धा उच्चस्तरीय चौकशी होणे फार गरजेचे असून या सर्व नमूद केलेल्या गोष्टींची चौकशी करण्यात यावी.नियमबाह्य,बेकायदेशीर दिलेली पीएमसी रद्द करण्यात यावी.न.प.ची होणारी आर्थीक हानी टाळावी व सभागृहाला विश्वासात न घेता नियमबाह्य,बेकायदेशीर पीएमसी देवुन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या मुख्याधिकारी डाॅ.विशाखा शेळकी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी विनंती वजा मागणी नगरसेवक नगरसेवक अरविंद डोहे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे,एकनाथजी शिंदे यांनाही सदर मागणीचे निवेदन तहसीलदार यांचे मार्फत पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.त्यावेळी नगरसेवक अरविंद डोहे,भाजपा शहर अध्यक्ष सतीशजी उपलेंचीवार,माजी संजय गांधी निराधार अध्यक्ष संजयभाऊ मुसळे,शहर महामंत्री हरीभाऊ घोरे ,संदिप जी शेरकी,हरबाजी झाडे उपस्थीत होते .यावर काय कार्यवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.