By : Rangnath deshmukh
चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणारा जिवती तालुक्यातील पाटण येथील एसबीआय बँकेचे प्रकरण सध्या सर्वत्र गाजत असून यात काही भूमाफियांनी बँकेमधील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून खोटा सातबारा कागदोपत्री जोडून खोट्या कर्ज केसची अफरातफरी केल्याची बाब दिवसेंदिवस चर्चेचा विषय बनत आहे
सदर प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली व्हावी यासंबंधी जनतेत तीव्र चर्चा सुरू आहे यातच खरे दोशी असणाऱ्या वर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी चर्चा रंगत असून सदर बँकेची बातमी लावण्यासाठी विदर्भ लाईव्ह न्यूज पोर्टलच्या रिपोर्टरनिंग गर्दीच्या दिवशी येऊन बँकेची शूटिंग केली त्या दरम्यान त्या ठिकाणी कोणताअवैद्य काम करणारा भू माफिया आहे की नाही याची विचारपूस न करता संबंधित पोर्टल ने व्हिडिओ करून बातमी प्रसारित केली यात टाटा कवडा व पाटण येथील प्रतिष्ठित नागरिक रिकामे बेंच असल्यामुळे त्या ठिकाणी बसले होते त्यांनाच उद्देशून हेच ते दलाल असे संबोधून सदर पोर्टल मध्ये बातमी लागल्यामुळे त्या व्हिडिओ दिसणाऱ्या सुज्ञ नागरिकांचा मान सन्मान नाचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून त्यांना विविध जनता प्रश्न विचारत आहे यामुळे त्यांचा मानसिक ताण वाढलेला असून सदर झालेला प्रकार शहानिशा न करता या पोर्टलने केलेल्या व्हिडिओ शूट मुळे घडल्याने यापुढे या पोर्टल ने योग्य ती चौकशी करूनच शहानिशा करावी उगीच कुणाला मानसीक खेळणे योग्य नाही यावर पाटण पोलीस स्टेशन येथे एफ आय आर नोंदवल्या गेली असून संबंधित प्रकरणाची माहिती कलेक्टर साहेबांना पर्यंत पोहोचवून योग्य ती कारवाई करण्यास निवेदन देण्यात येत आहे.