गडचांदूर,,,लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर जवळ असलेल्या निसर्गरम्य पहाडी भागात असलेल्या,गडचांदूर ची चौपाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमलनाला सिंचन प्रकल्प येथे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात यावे,अशी मागणी बऱ्याच वर्षांपासून होती,आमदार सुभाष धोटे यांनी अथक परिश्रम घेत अमलनाला पर्यटन स्थळ च्या विकासा साठी 7 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून 4 कोटी 86 लक्ष रुपये उपलब्ध करण्यात आले आहेत,त्या पैकी
2कोटी 36 लक्ष 13 हजार 369 रुपये ची निविदा निघाली असून विकास कार्याला प्रारंभ झाला आहे,
अमलनाला पर्यटन स्थळ च्या विकासासाठी चांदा ते बांदा प्रकल्प अंतर्गत 7 कोटी मंजूर झाले होते,मात्र कोरोना मुळे निधी रद्द करण्यात आला होता, आमदार सुभाष धोटे यांनी रद्द करण्यात आलेला निधी मंजूर करण्यासाठी नियोजन विभागाकडे पाठपुरावा करून 4 कोटी 86 लक्ष रुपये मंजूर करून घेतले आहे, उर्वरित 2 कोटी 25 लक्ष रुपये च्या मंजुरी साठी आमदार सुभाष धोटे प्रयत्नशील आहेत,
अमलनाला पर्यटन स्थळ चा विकास 3 टप्पा मध्ये होणार आहेत,
पहिल्या टप्प्यात संरक्षक भिंत, कुंपण, रेस्टॉरंट, बगीचा, स्विमिंग पूल,झोपड्या तयार करण्यात येणार आहेत,
दुसऱ्या टप्प्यात नौकायन,(बोटींग)मचाण, वॉटरपार्क, तयार करण्यात येणार आहेत, तर तिसऱ्या टप्प्यात वेस्ट वेअर चे सौन्दर्यीकरन केले जाणार आहेत,
अमलनाला सिंचन प्रकल्प च्या परिसरात मोठ्या प्रमाणात काही लोकांनी अतिक्रमण केले आहेत हे अतिक्रमण काढताना प्रशासन ला त्रास होणार आहेत,अशी माहिती प्रशासन ने दिली आहेत, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल ,
अमलनाला प्रकल्प येथे पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्दीकी यांनी सुद्धा प्रशासन, लोकप्रतिनिधी कडे सातत्याने पाठपुरावा केला आहे,