जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आमदार सुभाष धोटे यांनी केले वृक्षारोपण.


लोकदर्शन 👉 मोहन भारती
जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाच्या महिलांची विशेष उपस्थिती.

राजुरा (ता.प्र) :– जागतिक पर्यावरण दिन आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजुरा शहरातील तालुका क्रीडा संकुल परिसरात क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी वृक्षारोपण केले. या प्रसंगी सर्व उपस्थितांनी पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाने महाराष्ट्रात एक लाख वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, काँग्रेसच्या पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्षा स्वाती घोटकर, छायाताई बरडे, वर्षा बोरकर, प्रणिता बोरकर, स्वाती बच्चुवार, सोनाली हेडाऊ, अभिलाशाताई मेदंळकर, कांताताई दखने, प्रिती देखने, योगिताताई धनेवार, स्वप्नाली दखने, वैशाली दखने, महेश किन्नाके, जीवनदीप सर्पमित्र पर्यावरण बहुद्देशीय संस्था राजुराचे अध्यक्ष प्रवीण लांडे, सचिव रत्नाकर पचारे, उपाध्यक्ष संदीप आदे सदस्य तुषार खोके विजय पचारे, राहुल दुबे, सचिन खाडे यासह पर्यावरण प्रेमी नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *