दारूबंदी फसल्यानेच दारूबंदी उठवण्याची लोकइच्छा जागृत झाली : शासननिर्णयाचे स्वागत. आमदार सुभाष धोटे.

By : Mohan Bharti

चंद्रपूर जिल्ह्यात दारू सुरू / दारूबंदी योग्य की अयोग्य या वादात मला पडायचे नाही. मात्र ज्या आवेगाने दारूबंदी करण्यात आली. त्याच आवेगाने त्या पाच वर्षांत दारूबंदी कडकपणे लागू करण्यात आली नाही. उलट या काळात अवैध दारू विक्री दुप्पटीने वाढल्याचे अनुमान दिसून आले. राज्य शासनाला मिळणारा मोठा महसूल बुडाला. शालेय विद्यार्थी, तरूण पिढी सुद्धा झटपट पैसा कमवायचा म्हणून अवैध दारू विक्री व्यवसायात दिसू लागली. सभोवतालच्या परिसरात जिथे तिथे अवैध दारू विक्री आणि पिण्याच्या प्रमाणात वाढ झाली. नकली दारूचे प्रकार पुढे येऊ लागलेत. सामाजिक आरोग्यास धोका निर्माण झाला. जर दारूबंदीची पुर्णपणे कडक अंमलबजावणी झाली असती तर आज नागरिकांनी फसवी दारूबंदी उठवण्याची मागणी केली नसती आणि सरकारला दारूबंदी उठवायला संधीच मिळाली नसती. महाविकास आघाडी सरकारने फसव्या दारूबंदीने त्रस्त नागरिकांच्या लोकइच्छेनुसारच दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. मी या निर्णयाचे स्वागत करतो.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *