By : Yogesh Dudhpachare, Chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी आणि दारूबंदी वर आणलेली बंदी या दोन्ही गोष्टी चर्चेचा विषय ठरला आहे. दारूबंदीचे समर्थक महात्मा गांधींना किती मानतात ते माहिती नाही पण ते आता गांधींचा हवाला देऊन आपण जे केलं ते गांधींच्या विचारांच्या विरोधात किलो असे म्हणत आहेत. तर दारूबंदी उठवणाऱ्यांच्या सोबत असलेली मंडळी जे काही झाले ते योग्यच झाले, तुम्ही दारूबंदी केलीच नव्हती तर उलट लहान मुलांना दारूचे तस्कर केले होते. दारू बंधी झालीच नव्हती हे स्पस्टपणे पटवून देत आहेत.
खरंच दारूबंदी चा काही जिल्ह्याला उपयोग झाला का ? याबद्दल ची माहिती मी माहितीच्या अधिकाकारात चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासनाला मागितली होती. पोलिसांवर दारू तस्करांचे किती हल्ले झाले? दारूबंदीच्या काळात बलात्कारासारख्या घटना कमी झाल्या का ? दारूबंदीच्या काळात चोरट्या मार्गाने दारू विकणारे किती लोक गुन्हेगार ठरले? किती गुन्ह्यांची नोंद झाली? चोरटी दारू वाहून अंधारी किती वाहन जप्त केली गेली? अशा चार प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी मला दिली. मी विचारलेल्या दहा प्रश्न पैकी सहा प्रश्नांची उत्तरं पोलिसांकडेही नव्हती.
खुद्द पोलिसांनीच दिलेल्या माहितीच्या आधारावर हे म्हणता येते की दारूबंदीच्या काळात या सगळ्या गुन्ह्यांमध्ये आणि घटनांमध्ये खूप मोठा फरक आलेला नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हा एक अयशस्वी प्रयोग ठरला आहे. एक स्पष्टपणे म्हणावेसे वाटते की कायद्याने काहीही होणार नाही, सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करताना कायद्यासोबतच जागरुकता जास्त महत्त्वाची ठरते. लोकांमध्ये जागरूकता नसेल तर, दारूबंदी, प्लास्टिक बंदी, गुटखाबंदी, या सर्व बंदी असूनही उपयोग होणार नाही. लोकांतील जागृतता हा खरा गांधींचा मार्ग आहे. सरकार त्याकडे किती लक्ष देत आहे ते बघू या.