राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने गरजूंना फळे व अन्नदान.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


राजुरा :– उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील कोवीड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आमदार सुभाष धोटे यांचे नेतृत्व आणि मार्गदर्नाखाली राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून एक घास मदतीचा या उपक्रमांतर्गत गरजूंना अन्नदान वितरित करण्यात आले. आज या उपक्रमाचा हा सातवा दिवस असून आज अन्नदानासोबतच फळे सुद्धा वाटप करण्यात आली.
या प्रसंगी काँग्रेसचे जि प सदस्य मेघाताई नलगे, माजी सभापती तथा प स सदस्य कुंदा जेनेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवार, कृ.उ.बा.स राजुराचे संचालक अविनाश जेनेकर, नगरसेविका तथा महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष संध्या चांदेकर, तालुकाध्यक्षा कविता उपरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहू कुलमेथे, डॉ. चिदमवार, माजी नगरसेविका मिना लांडे, सुमित्रा कुचनकर, रामनगर काँग्रेस अध्यक्ष पुनम गिरसाळवे, महिला कार्याध्यक्ष शुभांगी खामनकर, जवाहर नगर काँग्रेस उपाध्यक्ष योगिता मटाले, जवाहर नगर काँग्रेस सचिव पुष्पवर्षा जुलमे, नंदा गेडाम, उज्वला कातकर, मंगला हांडे, अर्श्रना देवगडे, लहू चहारे, कवडु सातपुते इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *