By shankar tadas
* गडचांदुर परिसरात
95 नागरिकाकडून 21 हजार रुपये दंड वसूल
गडचांदूर : वारंवार सूचना करूनही गडचांदूर व नांदा फाटा परिसरात विनामास्क फिरणाऱ्या 95 नागरिकाकडून पोलिसांनी 21 हजार 100 रुपये दंड वसूल केला.
आज, 17 मे 21 रोजी पोलीस स्टेशन गडचांदूर येथे कोविड प्रतिबंधक म्हणून मास्कबाबत SDPO सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद गडचांदूर व पोलीस स्टेशन गडचांदूर यांनी विशेष मोहीम राबवून ही कारवाई केली. पो. स्टे गडचांदूर हद्दीत गडचांदूर, नांदा फाटा येथे विना मास्क फिरणाऱ्या 95 नागरिकांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करून एकूण 21 हजार 100 रुपये नगदी दंड वसूल केला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या विरुद्ध 30 वाहन चालका विरुद्ध मोटार वाहन कायदा अन्वये कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांच्या नेतृत्वाखाली गडचांदूरचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडली.
सर्व नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये व मास्क चा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून पुन्हा अश्याच प्रकारची मोहीम राबविण्यात येणार असल्याचा इशारा ठाणेदार गोपाल भारती यांनी दिला आहे.