लोकदर्शन 👉 प्रतिनिधि रंगणाथ देशमुख
सध्या गडचंदुर शहरामध्ये कोरोणाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कालच होली फॅमिली फँमेली सेंटर मध्ये ऑक्सिजन न मिळाल्याने दोघांचा मृत्यू झाला होता
प्रत्यक्षात आम्ही पाहणी केली असता त्या ठिकाणी डॉक्टरांची सुविधा योग्य त्या प्रमाणात दिसून आली नाही , अल्पोहार नाष्टा जेवनासंबंधी ही अनेकांच्या तक्रारी होत्या ,यासंदर्भात वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांना तात्काळ नियोजन करण्यासाठी विनंती केली पण आजही परिस्थिती पालथ्या घागरीवर पाणीच आहे
होली फॅमिली ऑक्सिजन बेडची पोल-खोल
आज पुन्हा गडचांदूर मध्ये अक्सिजन न मिळाल्यामुळे एका माणिकगड मधील सेक्युरिटी गार्ड ला ॲम्बुलन्स ने चंद्रपूर साठी रवाना करत असताना त्यांचा मृत्यू झाला ,गडचांदूर मध्ये दहा ऑक्सिजन बेड उपलब्ध असते तर कदाचित कालच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला नसता त्याच पद्धतीने आज एकाला जिवाला मुकावे लागले नसते याप्रकरणी घोषणा करणाऱ्या मंडळी व प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का करू नये??
मनसे राजुरा विधानसभा अध्यक्ष महालिंग कंठाळे