By : Mohan Bharti
आमदार स्थानिक विकास अंतर्गत १५ लक्ष रूपयाचा निधी.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील अर्तिदुर्गं भागातील आदिवासी बांधवांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पठाण तहसील जिवाती येथे आमदार सुभाष धोटे यांनी रुगणवाहिका भेट दिली आहे. यासाठी आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत १५ लक्ष रूपये मंजूर करण्यात आले आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रात ग्रामीण भागात सध्या मोठय़ा प्रमाणात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच साथीचे आजार सुध्दा फोफावत आहेत. एकूण परिस्थिती लक्षात घेता जिवती तालुक्यातील पाटण सारख्या अतिदुर्गम भागातील गोरगरीब नागरिकांना रूग्णांना आवश्यकतेनुसार ने आन करण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज होती. स्थानिक नागरिकांची ही गरज आणि कोरोना रुग्णांसाठी यथासंभव मदत करण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी युद्ध स्तरावरील प्रयत्न केल्यायामुळे आमदार सुभाष धोटे यांनी आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत येथे तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी पाऊल उचलले आहे. यामुळे अतिदुर्गम, आदिवासी बहुल भागातील रुग्णांची होणारी गैरसोय आता दूर होईल. आमदार सुभाष धोटे यांनी या आधीच जिवती येथे १५ लक्ष रूपये निधी मंजूर करून एक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे हे विशेष. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे सदर प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजूरी मिळताच येथे रुग्णवाहिका उपलब्ध होईल.