लोकदर्शन ÷मोहन भारती
*टेंट उभारण्याची मागणी
कोरपना – गडचांदूर येथे ग्रामीण रुग्णालयात लसीकरण व आरटीपीसीआर व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू असून या ठिकाणी नागरिकांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागत असून त्याठिकाणी सावलीसाठी टेंट उभारण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दोन्ही ठिकाणी लसीकरण व आरटीपीसीआर साठी उन्हात लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. तसेच अनेक जेष्ठ नागरिक रस्त्यावर उन्हातान्हात उभे राहून आरटीपीसीआर चाचण्या करताना दिसून येत आहे. कोरोना काळात रूग्णांना दिलासा देण्याची गरज असताना कुठलीही व्यवस्था त्याठिकाणी नाही. गडचांदूर नगरपरिषदेने लसीकरण व आरटीपीसीआर केंद्रामध्ये पेंडॉल व खुर्च्यांची व्यवस्था करावी अशी मागणी प्रशांत धाबेकर या शिक्षकाने केली आहे.
सामाजिक अंतराचे पालन होत नाही.ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण व आरटीपीसीआर केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने सामाजिक अंतराचे कुठलेही पालन होताना दिसत नाही. याकरिता सुद्धा नगरपरिषदेने काहीतरी नियोजन करणे आवश्यक आहे.