लोकदर्शन👉 मोहन भारती
*३१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने केले रक्तदान*
कोरपना तालुक्यातील नारंडा येथे कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत नारंडा,रक्तदान महादान नि:स्वार्थ सेवा फॉउडेशन व आशिष ताजने मित्र परिवार यांच्या तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंबे,कार्यक्रमाचे उद्घाटक नारंड्याच्या सरपंच सौ.अनुताई ताजने,प्रमुख पाहुणे आरोग्य अधिकारी डॉ.माधुरी टेंबे,उपसरपंच बाळा पावडे,माजी सरपंच वसंता ताजने,पोलीस पाटील नरेश परसुटकर,डॉ.गावित सर,अनिल शेंडे उपस्थित होते.
प्रत्येक रक्तदात्यांनी आज रक्तदान करण्याची अत्यंत गरज असुन कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत आहे.तसेच रक्तदान ही काळाची गरज असून समाजातील प्रत्येक सुजान नागरिकांनी आपले कर्तव्य बजावत रक्तदान करावे,तसेच येणाऱ्या पिढीला सुद्धा रक्तदानाची सवय लावून आदर्श समाज निर्माण करावा.तसेच प्रत्येकांनी रक्तदानाचा संकल्प केल्यास कोणत्याही रुग्णाला रक्तदाची कमतरता भासणार नाही असे यावेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी सांगितले.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.स्वप्नील टेंबे व पोलिस पाटील नरेश परसुटकर यांचे सुद्धा समयोचित भाषणे झाली.
यावेळी नारंडा व नारंडा परीसरातील ३१ रक्तदात्यांनी रक्तदान करीत या पवित्र कार्यात सहभाग घेत माणुसकीचा परिचय दिला.व सर्व रक्तदात्यांचे आयोजकांनी आभार व्यक्त केले आहे.यावेळी सर्व रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
यावेळी सत्यवान चामाटे, अजय तिखट,प्रवीण हेपट,अनिल मालेकर,प्रमोद शेंडे,अंकित परसुटकर,अरुण निरे,महेश बिल्लोरिया साईनाथ तिखट,वैभव तिखट,विनोद कुचनकर,वैभव गंगमवार,संदीप चौधरी,हर्षल चामाटे, मनीष मालेकर,यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन प्रवीण हेपट व आभार प्रदर्शन नरेश परसुटकर यांनी केले.