👉 लोकदर्शन
*(अविनाश देशमुख शेवगांव)* खासदार डॅा.सुजय विखे यांनी दिल्लीवरून विमानाने आणलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शन प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती.या प्रकरणात अक्षेप घेत सर्वसामान्यांना एक इंजेक्शन मिळत नसताना खासदार विखे यांना एवढ्या मोठ्या संख्येने इंजेक्शन कसे मिळाली असा सवाल करून काही याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.खा. डॉ. सुजय विखे रेमडीसिवर प्रकरण तपास Dysp संदीप मिटके यांच्याकडे
-संदीप मिटके टीम सह पोहचले शिर्डी विमानतळावर खा. सुजय विखे यांच्या अडचणीत वाढ विमानतळ अधिकाऱ्याची चर्चा करून
फुटेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू
या याचिकेवर काल गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. त्यात या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश न्यायलयाने पोलिसांना दिले आहे. तसेच गृह विभागाचे प्रधान सचिव यांना शिर्डी विमानतळावर १० एप्रिल ते २५ एप्रिल पर्यंत च्या तारखांना आलेल्या सर्व खाजगी विमानांचे सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहे. तरी आत्ता समजलेल्या ताज्या माहितीनुसार नगर पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील यांनी या प्रकरणाचा तपास श्रीरामपूरचे डिवायएसपी श्री.संदीप मिटके यांच्याकडे दिला असल्याची ताजी बातमी मिळाली आहे. श्री. मिटके यांनी नुकतेच जिल्हाभर गाजलेल्या राहुरी तालुक्यातील पत्रकार दातीर खून प्रकरणाचा राजकीय दबाव असतानादेखील अतिशय योग्य प्रकारे छडा लावला होता. यामध्ये दोनच दिवसापूर्वी त्यांनी युपी येथून एका आरोपीला अटक केली होती. तरी न्यायालयाच्या आदेशाने खासदार सुजय विखे इंजेक्शन प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूरचे डीवायएसपी संदीप मिटके हे करणार असून यामध्ये नेमके काय निष्पन्न होते हे पाहणे आता औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.
*एसपी मनोज पाटील यांनी डिवायएसपी मिटके यांच्या तपास कामाची तत्परता पाहता त्यांना हा राजकीय रंग असलेल्या प्रकरणाचा तपास दिला असल्याची चर्चा आहे*