लोकदर्शन
पोंभुर्णा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार यांना भाजपातर्फे श्रध्दांजली
गजानन गोरंटीवार यांच्या निधनाने भाजपाचा संघटनेतील झंझावात संपला असुन आजही ही घटना खोटी ठरावी असे मनोमन वाटते अशी भावना विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. त्यांनी प्रभावी पाठपुरावा करून पोंभुर्णा नगर पंचायत क्षेत्रात जी विकासकामे खेचुन आणत लक्षपुर्वक पुर्णत्वास आणली. अशी विकासकामे महाराष्ट्रातील कोणत्याही नगर पंचायतीमध्ये झालेली नाहीत, याचे सर्वस्वी श्रेय गजानन गोरंटीवार यांचेच आहे. त्यांच्या स्मृतींचा गंध कायम आमच्या हृदयात दरवळत राहील अशी भावना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
दि. २९ एप्रील रोजी भाजपा चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे गजानन गोरंटीवार यांना ऑनलाईन सभेद्वारे श्रध्दांजली वाहण्यात आली. या सभेत आ. मुनगंटीवार बोलत होते. गजानन गोरंटीवार यांच्या रूपाने पक्षातील कोहीनुर हीरा आम्ही गमावला आहे. पोंभुर्णा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा हे त्यांचे स्वप्न होते ते आम्ही निश्चितपणे पुर्ण करू असेही आ. मुनगंटीवार म्हणाले. जनसेवेचे व्यसन त्यांना होते. या व्यसनातुनच पोंभुर्णा तालुका व शहराचा विकास साधला गेला. लोकांच्या मदतीला धावुन जाणे हा त्यांचा स्थायीभाव. सुस्क़त, सभ्य नेता आम्ही त्यांच्या निधनाने गमावला याची आयुष्यभर खंत राहील. त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहु असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी बोलतांना माजी केंद्रीय ग़हराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, पोंभुर्णा तालुक्यात गजानन गोरंटीवार यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत भाजपाचा विचार पोहचविला. पक्ष संघटनेला सातत्याने बळ देणारा हा कार्यकर्ता म्हणजे पक्षाची संपत्ती होता. पक्षाप्रती त्यांची प्रचंड निष्ठा होती. लोकसेवेसाठी सतत झटणा-या गोरंटीवार यांच्या चेह-यावर सदैव पक्षकार्याविषयी चिंता दिसायची. हा समर्पित कार्यकर्ता आमच्यातुन निघुन गेला याचे शल्य मोठे असल्याचे हंसराज अहीर म्हणाले. भाजपाचा सच्चा कार्यकर्ता कसा असावा याचे म़र्तीमंत उदाहरण म्हणजे गजानन गोरंटीवार, सर्वसामान्य जनतेसाठी जगणारा हा नेता आपल्यातुन निघुन गेला यावर विश्वास बसत नाही अशा शब्दात माजी आ. अतुल देशकर यांनी श्रध्दांजली वाहली. कोरोना काळात सामान्य नागरिकांना बेडस्, रेमिडीसीवीर मिळावे यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरू होती. रूग्णांसाठी धडपणारा हा नेता अचानक आपल्यातुन निघुन जातो ही घटना अविश्वसनीय असल्याचे बल्लारपूर नगर परिषद अध्यक्ष हरीश शर्मा म्हणाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, ब्रिजभुषण पाझारे आदींनी शोकभावना व्यक्त केल्या.
सभेचे प्रास्ताविक पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम यांनी केले, गजानन गोरंटीवार यांच्या निधनाने पोंभुर्णा शहरासह पोंभुर्णा तालुका शोकाकुल झाला असुन सच्चा सहकारी कार्यकर्ता आम्ही गमावला असल्याचे त्या म्हणाल्या. घरादारावर तुळशिपत्र ठेवून पक्ष संघटनेसाठी झटणारा भाउ गमावल्याचे दुःख मला व्यक्तीशः असल्याचे अल्का आत्राम म्हणाल्या. या सभेत संजय गजपुरे, ज्योती बुरांडे, रजिया कुरेशी, अज्जु कुरेशी, रेणुका दुधे, डॉ. मंगेश गुलवाडे, चेतनसिंह गौर, महापौर राखी कंचर्लावार, काशिसिंह, आशिष देवतळे, रवी आसवानी आदी भाजपा पदाधिका-यांची उपस्थिती होती.