नांदा येथे लसीकरण केन्द्र सुरु करण्यास प्रशासनाची टाळाटाळ

दि 27/4/2021👉 मोहन भारती
⭕जिल्हा परिषद सदस्याचा उपोषणाचा इशारा

⭕लस घेण्याकरिता भटकंती

⭕१५००० लोकवस्तीचे विदारक वास्तव्य

÷कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी औद्योगिक नगरी नांदा ग्रामपंचायतची ओळख आहे येथील लोकसंख्या पंधरा हजार च्या वर आहेत मात्र येथे प्रशासनाने लसीकरण केंद्रच न दिल्याने नागरिकांना लस घेण्याकरिता कवठाळा , नांरडा , गडचांदूर अशी भटकंती करावी लागत असून लसीकरण केंद्रावर गर्दी असल्याने अनेकदा लस मिळत नसल्याने नांदा वासियांना रखरखत्या उन्हात कमालीचा त्रास सहन करावा लागतो येत्या सोमवारपर्यंत नांदा येथे लसीकरण केंद्र सुरू न केल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे कक्षासमोर उपोषणाचा इशारा जिल्हा परिषद सदस्य शिवचंद काळे यांनी दिला असून कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता याठिकाणी प्रशासनाने तात्काळ लसीकरण केंद्र सुरू करण्याची गरज आहे

नांदा येथील लोकसंख्या १५ हजारचे वर आहेत मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग या ठिकाणी वास्तव्यास आहेत लसीकरण केंद्राकरिता या ठिकाणी प्रशस्त अशा अनेक इमारती नांदा ग्रामपंचायतीकडे येथील सिमेंट कंपन्या स्वत:चे लसीकरण केन्द्र सुरु करतील असे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने जाणीवपूर्वक नांदा येथे लसीकरण केंद्र दिले नाही अशी जनमानसात चर्चा आहे नांदा येथील युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांनी अनेकदा लसीकरण केंद्राची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली असता आरोग्य केंद्र नसल्याची बतावणी करून लसीकरण केंद्र देण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती आहे मोठी लोकसंख्या असतांनाही लसीकरण केंद्र न दिल्याने येथील नागरिकांची लसीकरणा करिता भटकंती होत असल्याचे विदारक वास्तव्य आहेत

नांदा येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे वारंवार मागणी करीत आहे छोट्या छोट्या गावांमध्ये लसीकरण सुरू आहेत मात्र नांदा येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यास अधिकारी सकारात्मक दिसत नाही नांदाफाटा आवारपु्र परीसर कोरोनाचा हाॅटस्पाॅट आहेत २०० चे वर अॅक्टिव्ह रूग्ण आहेत तर १५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे येत्या सोमवारपर्यंत नांदा येथे लसीकरण केंद्र सुरू न केल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे कक्षासमोर आमरण उपोषणास बसणार आहे

शिवचंद काळे
सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर

ऑक्सिजन बेडसह कोविड सेंटर सुरु करा

परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग आहे अनेकांचा ऑक्सिजन लेव्हल अचानक कमी होत आहे गृह विलीनीकरणात संसर्ग होऊ नये याकरीता शासनाचे आदेशान्वये नांदा ग्रामपंचायतद्वारे विलिनीकरण केन्द्र सुरु करण्यात आले आहे मात्र सुविधा नसल्याने कोविड रुग्ण येत नाही विलगीकरण केंद्राऐवजी याठिकाणी ५० बेडचे कोविड सेंटर सुरू करावे व त्यात १० बेड ऑक्सिजनची द्यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अभय मुणोत यांनी केली आहे

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *