लोकदर्शन दि 26/4/2021 मोहन भारती
कोरपना तालुक्यात 45 वर्षावरील 11,870 नागरिकांनीG आजपर्यंत कोविड लस घेतली आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी स्वप्नील टेम्भे यांनी दिली आहे,
तालुक्यात एकूण लाभार्थी ची संख्या 37,127 आहेत, यात 60 वर्षावरील 12,376 नागरिकांचा समावेश आहे. शुक्रवार पर्यंत तालुक्यात झालेले लसीकरण याप्रमाणे आहेत, ग्रामिण रुग्णालय, गडचांदूर,2888,ग्रामीण रुग्णालय, कोरपना,2834, प्राथमिक आरोग्य केंद्र, नारंडा 2880,प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा,2042,प्राथमिक आरोग्य केंद्र,मांडवा,1226 असे एकूण 11,870 लसीकरण झाले आहेत.कोरपना तालुक्यात आता अंतरगाव,बाखर्डी, दुर्गाडी, माथा, कोळशी(बु),येरगव्हान, येथे सुद्धा कोविड लसीकरण करण्यात येणार आहेत, असे डॉ, स्वप्नील टेम्भे,यांनी सांगितले. 18 वर्षावरील सर्व नागरिकांना सुद्धा कोविड लस घेणे गरजेचे आहे.1 मे पासून ही लस दिली जाणार आहेत,तरी नागरीकांनी आरोग्य विभागाच्या COWIN या ऍप्स वर नोंदणी करून लस घ्यावी.
डॉ, स्वप्निल टेम्भे,आरोग्य अधिकारी, नारंडा