!!विलगिकरन ची व्यवस्था करण्यात यावी!!
!! कोरपना व गडचांदुर येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे!!
!! गडचांदूर शहर भाजपची मागणी!!
दि 22/ 4/2021 शिवाजी सेलोकर
गडचांदूर — महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेले आदिवासी बहुल कोरपना तालुक्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे.आता ग्रामीण भागात सुद्धा वमोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढीत आहे.कोरोनाचे तपासणी केंद्र हे निव्वळ कोरपना व गडचांदूर शहरात असून ग्रामीण भागात कुठेही नाही.सदरची तपासणी करण्या करीता ग्रामीण भागातील नागरिकाना कोरपना वा गडचांदूर येथे येणे शक्य होत नाही.त्यामुळे ग्रामिण भागातील रुग्ण हे त्याच ठिकाणी आपल्या खाजगी रुग्णालयात उपचार करीत असतात व शेवटच्या वेळी चंद्रपूर येथे हलविल्या जातात तेव्हा त्यांना बेड अभावी मृत्यू झाल्याचे अनेक प्रकार घडले.जर ग्रामीण भागात जर कोविड तपासणी केंद्र वाढविल्यास सहज ग्रामीण भागातील नागरिक आपली तपासणी करतील व त्यामुळे वेळीच योग्य उपचार होऊन मृत्यूच्या संख्येत घट होऊ शकते.त्यामुळे कोरपना तालुक्यात किमान नवीन चार तपासणी केंद्र देण्यात यावे.
सध्या कोरोना बाधितांची संख्या वाढत असून कित्येक रुग्ण आपल्या घरीच राहून उपचार घेत आहे.परन्तु काही लोकांकडे स्वतःचे घरी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था नसल्याने ते कुटुंबात राहतात त्यामुळे त्यांचा सम्पर्क इतर कुटुंबातील व्यक्ती सोबत येऊन रुग्ण वाढत आहे.करिता अलगिकरन ची व्यवस्था करून ज्यांना घरी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था नाही.अशा करिता अलगीकरण ची व्यवस्था करण्यात यावी.
कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोका पासून चंद्रपूर 75 गकिमी अंतर आहे.व कोरोना बाधितांची संख्या संपूर्ण जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे व त्याचा भार चंद्रपूर या ठिकाणी येत असून रुग्णालयात ऑक्सिजन व बेड कमी पडत आहे.त्यामुळे कित्येक लोकांना जीव गमवावा लागत आहे.जर कोरपन्याला एक व गडचांदूरला एक असे 50 बेडचे कोविडकेअर सेंटर उभारले तर येथील नागरिकांना सोईचे होईल. व चंद्रपूर येथील भार कमी होईल तेव्हा कोरपना व गडचांदूर येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे या मागण्याचे निवेदन गडचांदूर भाजपा कडून मा तहसीलदार कोरपना यांचे मार्फत मा जिल्हाधिकारी तथा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर यांना शहर अध्यक्ष सतीश उपलेंचवार,नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष संजय मुसळे यांनी दिले असून यावर काय कार्यवाई होईल याकडे सर्व तालुकावासींचे लक्ष लागले आहे.