20/4/2021 शिवाजी सेलोकर
-बिबी येथील आरोग्य उपकेंद्रातील प्रकार
-नागरिकांनी व्यक्त केला h.bसंताप
कोरपना
तालुक्यातील बिबी उपआरोग्य केंद्रावर आजपासून कोव्हीड १९ चे लसिकरण करण्यास सुरुवात झाली. या केंद्रावर पहिल्याच दिवशी बिबी येथील शिक्षक विठ्ठल टोंगे (वय ४०) यांनी लसिकरण केंद्रावरील रांगेत असलेल्या जेष्ठ नागरिक सुधाकर तांबरे (वय ६५) यांना हातावर व डोक्यावर जबर मारहाण करुन जखमी केल्याचा संतापजनक प्रकार घडला.
विठ्ठल टोंगे हे नांदाफाटा येथील शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कुल येथे शिक्षक आहे. जेष्ठ नागरिक सुधाकर तांबरे हे लसिकरण केंद्रावर कोव्हीड १९ लस घेण्यासाठी आले होते. नियोजित वेळ तसेच लाईननूसार व दुस-या क्रमांकावर ते उभे होते. शिक्षक विठ्ठल टोंगे यांचा सदर केंद्रावर कुठलाही संबंध नसतांना आलेल्या नागरिकांवर अरेरावी करत होते. तांबरे यांचा लस घेण्याचा दुसरा क्रमांक होता मात्र त्यांना जावू दिले नाही. यातच टोंगे यांनी नागरिकांच्या समोर जेष्ठ नागरिक तांबरे यांना मारहाण केली. यात तांबरे यांना डोक्याला व कमरेला बुक्यांनी मारहाण करुन दुखापत केली. तांबरे यांच्या हाताला चांगलीच दुखापत झाली असून रक्त बाहेर आले. पहिल्याच दिवशी लसिकरण केंद्रावर झालेल्या या प्रकारामुळे बिबी येथील नागरिकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.
मी कोरोनाची लस घेण्यासाठी बिबी आरोग्य उपकेंद्रावर रांगेत हजर होतो. माझा दुसरा नंबर होता. पण मला विठ्ठल टोंगे या खाजगी शिक्षकाने जावू दिले नाही. मला सगळ्यांच्या समोर मारहाण केली. माझ्या डोक्याला व पाठीवर मारहाण केली. माझ्या हाताला गंभीर दुखापत झाली असून रक्त लागले. मला मारायला खुर्ची उचलली. वडीलांसारख्या जेष्ठ नागरिकांवर हात उचलणे हे एका शिक्षकाला शोभत नाही.
– सुधाकर तांबरे, बिबी