!! नांदाफाटा किंव्हा बीबी येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची भाजपा कडून मागणी !!

By : shivaji Selokar 

गडचांदूर — कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असून देशातील जनता हैराण झाली आहे.शासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न चालू असून सर्विकडे कोविड लसीकरण केंद्र चालू केले आहे. कोरपना तालुक्यात -कोरपना, गडचांदूर,नारंडा,कावठाळा येथे केंद्र चालू करण्यात आले आहे.परन्तु नांदाफाटा येथे 20 हजार लोकसंख्या असून लागूनच एल अँड टि सिमेंट कम्पनी आहे.जवळच आवळपुर,बीबी मोठे गाव असून त्या ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र नसल्याने तेथील लोकांना गडचांदूर व कावठाळा येथे जाने शक्य नाही.परिसरातील बहुतेक लोक सिमेंट कँपणीत नौकरी करीत असल्याने त्यांना आपली ड्युटी सोडून कोरोना लसीकरण करीता जाऊन लाईन लावावे लागत आहे.जर नांदाफाटा किव्हा बीबी येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू केल्यास तेथील नागरिकांना सहज लस भेटू शकते. त्याकरिता नांदाफाटा किव्हा बीबी येथे केंद्र चालू करण्याची मागणी मा.जिल्हाधिकारी यांना तालुका आरोग्य अधिकारी कोरपना यांचे मार्फत भारतीय जनता पार्टी गडचांदूर च्या वतीने जिल्हा सदस्य तथा कोरपना पंचायत समितीचे माजी सभापती संजयभाऊ मुसळे,गडचांदूर शहर अध्यक्ष सतिशजी उपलेंचिवार,भाजपा नेते निलेशजी ताजने,नगरसेवक अरविंद डोहे,महेश घरोटे, महादेव एकरे यांनी केली आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *