,,कोरोना योद्धा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम 30 औषधी चे वाटप,,
By : Mohan Bharti
होमिओपॅथी चे संस्थापक डॉ, सॅम्युअल हॅनीमन यांचा जन्मदिन 10 एप्रिल हा जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा करण्यात येतो,
गडचांदूर शहरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन गडचांदूर च्या वतीने पोलीस ठाण्यात जागतिक होमिओपॅथी दिन साजरा करण्यात आला,
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ, प्रदीप खेकडे होते,कार्यक्रमा चे उदघाटन पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांच्या हस्ते करण्यात आले, प्रमुख अतिथी म्हणून होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ, के,आर,भोयर, जेष्ठ पत्रकार प्रा, अशोक डोईफोडे होते,
सर्वप्रथम होमिओपॅथी चे संस्थापक डॉ, सॅम्युअल हॅनीमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली,
याप्रसंगी कोरोना योद्धा म्हणून रात्रंदिवस कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांना होमिओपॅथी औषध आर्सेनिक अल्बम 30 चे वाटप करण्यात आले,
डॉ, के,आर,भोयर व डॉ, कुलभूषण मोरे यांनी होमिओपॅथी चे महत्त्व पटवून दिले,
पोलीस निरीक्षक गोपाल भारती यानी होमिओपॅथी औषध कोरोना प्रतिबंधक म्हणून अतिशय उपयुक्त आहेत असे सांगत पोलिसांनी आर्सेनिक अल्बम चे नियमित सेवन केल्याने स्थानिक पोलीस कोरोना मुक्त असल्याचे सांगितले, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना होमिओपॅथी औषध उपलब्ध करून दिल्या बद्द्ल डॉ, के,आर,भोयर यांचे आभार मानले,
याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र रायपुरे, प्रमोद शिंदे, डॉ, प्रवीण लोनगाडगे,डॉ, श्रीनिवास सोनटक्के, डॉ, पंकज देरकर,डॉ, निखील डाखरे, डॉ, रोहित गोवारदीपे,पोलीस कर्मचारी उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन डॉ, के,आर,भोयर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ, प्रविण लोनगाडगे यांनी केले,कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी नितीन निवलकर, संजय गुहे,तथा पोलिसांनी सहकार्य केले,