दि 9/4/2021
Abp माझा चे वृत्तनिवेGBदक सौरभ कोरटकर यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद
मीडिया हाऊस मध्ये काम करायचे असेल तर त्याआधी मीडिया हाऊस मधील न्यूज रूम चे काम कसे चालते हे माहिती असणे गरजेचे आहे. तेथील सगळ्या गोष्टी कश्या पद्धतीने हाताळल्या जातात. याबद्दल आपल्याला पूर्व कल्पना असेल तर पुढे जाऊन आपण छान पद्धतीने स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकतो.
श्री.नारायण गुरू महाविद्यालय हे नेहमी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न करत असते. यंदाचे वर्ष हे भलेही घरबसल्या व्हर्चुअल क्लासेसचे असले तरी त्यात विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त बाहेरील जगाचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी विविध वर्कशॉपचे आयोजन करते.
आज दिनांक ०९/०४/२०२१ रोजी झूम प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मल्टी मीडिया अँड कम्युनिकेशन विभागाने न्यूज रूम कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात abp माझाचे सुप्रसिद्ध न्यूज अँकर सौरभ कोरटकर यांनी विविध महाविद्यालयाच्या एकूण १८८ विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. न्यूज रूम म्हणजे काय ? त्यात विविध विभाग कोणते व ते कश्याप्रकारे काम करतात. न्यूज अँकरला बातमी सादर करत असताना कोणती साधन हाताळावी लागतात याबद्दलचे मार्गदर्शन अगदी सोप्या पद्धतीने त्यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर अगदी सोप्या शब्दात सौरभ यांनी दिले. पी.पी. टी साईल्ड चा आधार घेत त्यांनी सर्व संकल्पना अगदी सोप्या शब्दात मांडल्या. मल्टी मीडिया अँड कम्युनिकेशन विभागाने आयोजित केलेल्या न्यूज रूम वर्कशॉपचे सध्या सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. वर्कशॉपचे सूत्रसंचालन क्षमता चव्हाण तर आभार प्रदर्शन पराग गोगटे यांनी केले.
©शुभम शंकर पेडामकर