गडचांदूर न.प.च्या नावाने “चांगभलं” अध्यक्षांची भेटच घडेना कर्मचारी ऎकेना !!

गडचांदूर:- कोरपना तालुक्यात सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषद हल्ली अनेक बाबींमुळे चर्चेत असून अखेर याठिकाणी चालले तरी काय असा प्रश्न नागरिकांना पडलेला दिसतोय.नागरिक नाना तक्रारी घेऊन याठिकाणी येतात मात्र समाधानकारक काहीच घडत नसल्याची बोंब सुरू आहे. नगराध्यक्षांची भेटच होत नाही आणि कर्मचारी मुख्याधिकाऱ्यांना भेटू देत नाही मग ग-हाणे मांडायचे तरी कुणाकडे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.तोंडी तर सोडाच लेखी तक्रारींचे सुद्धा निराकरण होत नसल्याचे आरोप होत आहे.
भोयगावच्या दिशेने गडचांदूरवरून पुढे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आलेल्या खोदकामाची माती व इतर मटेरिअल बाजूच्या नाल्यात टाकल्याने सांडपाण्याची वाट बंद झाली.परिणामी प्रभाग क्रमांक २ होंडा शोरूमच्या मागील वसतीत राहत असलेल्या लोकांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.पुढची वाट बंद पडल्याने पाणी एकाच ठिकाणी साचून अक्षरशः नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले असून दुर्गंधी पसरली आहे.विषारी सर्प व इतर जीवजंतू शेजारच्या घरात प्रवेश करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.सदर समस्या स्थानिक नगरपरिषदेच्या संबंधित विभागाला सांगण्यात आली पण आजतागायत याकडे गंभीरतेने पाहण्यात आले नसल्याचे बोलले जात आहे.दिवसरात्र साप,विंचु घरात प्रवेश करत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.परिसरात दुर्गंधी पसरल्याने या कोरोनाच्या काळात आरोग्य धोक्यात आले असून गेल्या एक महिन्यापासून नगरपरिषदेचे उंबरठे झिजवत आहे परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत येथील एका रहिवाशाने News 34 पुढे व्यक्त केली आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *