खरकवाडी गावातील “आई सोमजाई देवीचा पालखी सोहळा” कार्यक्रम अत्यंत सादेपणात पार पडला..

प्रतिनिधी: महेश कदम

खरकवाडी गावातील “आई सोमजाई देवीचा पालखी सोहळा” कार्यक्रम अत्यंत सादेपणात पार पडला..

कोकणातील गणेशोत्सव ला जसा महत्व आहे तसेच होळी (शिमगा) ला ग्रामदैवत असणारी आईच्या पालखी सोहळा ला देखील अधिक महत्त्वाचे स्थान आहे. अशाच निसर्गरम्य कोकणात असणारी ग्रामदैवत म्हणजे आई सोमजाई देवी. ही देवी तालुका: महाड, जिल्हा: रायगड येथे असुन वाकी, गावठण, शेवते, नानेमाची, आंब्याचा माळ, खरकवाडी, रोहिदास वाडी, शेंदुरमळई, नारायण वाडी, पेडामकरवाडी, शिवाजी नगर असे १२ वाडीत आईची पालखी सोहळा आनंदाने भक्तिभावाने साजरी केली जाते, थाटामाटात पालखी फिरवली जाते, आईची पालखी दर्शनाला अनेक मान्यवर उपस्थित रहातात, मुंबई चे तसेच अनेक ठिकाणी राहणारी लोकं आई सोमजाई च्या दर्शनाला येतात, आईची ओठी भरतात, नवस फेडतात, परंतु यंदा कोरोना चा पार्श्वभूमीवर सर्वीकडे भितीचे वातावरण व संकट असल्या मुळे ही पालखी घरोघरी न फिरता अत्यंत साधेपणाने शासनाचे नियम पालुन ग्रामस्थाने साजरी करावी असे मार्गदर्शन सोमजाई देवी ट्रस्ट चे अध्यक्ष श्री. संजय गंगाराम कदम व सरपंच श्री. द्वारकानाथ जाधव सर यांनी ग्रामस्थांना केली आहे. प्रतेक वाडीतील मंदिराच्या आवारात पालखी रहणार असुन तिचे दर्शन घेतले जाणार आहे व शेवटी पालखीचे विसर्जन करण्यात येणार आहे.

खरकवाडी गाव येथील शासनाच्या अटी आणि नियमावली चे पालन करून, आई सोमजाई देवी ट्रस्ट च्या मार्गदर्शनानुसार, ग्रामस्थांना तसेच सासुरवाशीण-माहेरवाशीण यांना ओट्या भरण्यासाठी आणि दर्शनासाठी पालखी हनुमान मंदिरात ठेवण्यात आली होती. सत्य नारायणची पुजा व प्रसादाचा चा लाभ सुद्धा ग्रामस्थ तर्फे केले होते. सोशल डिस्टन्स ठेवणे, मास्क घालणे, रांगेत उभे राहून दर्शन घेणे या साठी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ श्री. श्रीरंग भोसले, श्री. सुरेश मोरे,श्री. विजय जाधव, श्री. बाबाराम कदम, श्री. बाळाराम मोरे, श्री. अशोक कदम, श्री. संतोष जाधव, श्री. जयसिंग पवार, या ग्रामस्थांनी योग्य मार्गदर्शन आयोजन केले. तसेच इतर ही ग्रामस्थ मंडळी, श्री. सतीश मोरे, श्री.राजेश मोरे, श्री.संजय येलकर, श्री.विलास म्हामुणकर, श्री.मनोहर कदम, श्री.शिवाजी जाधव, श्री.अनिल कदम, श्री.ललित भोसले आणि इतर ग्रामस्थांनी शिस्त आणि नियमांचे पालन करून कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली. तसेच विशेष उपस्थित्ती म्हणजे, खरकवाडी ग्रामस्थ श्री. विनोद पांडुरंग कदम, श्री. मनोज पांडुरंग कदम, श्री. महेश पांडुरंग कदम (पत्रकार) या तिन्ही बंधूंनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली व त्यांच्या तर्फे ग्रामस्थ लोकांना सेनिटायजर, मास्क, हॅनड गल्लाऊस वाटप करण्यात आले. या कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे व हनुमान सेवा ग्रामविकास मंडळाचे विशेष आभार मानले आहे, अशा प्रकारे आई सोमजाई देवी च्या पालखी ला ग्रामस्थ लोकांनी शासनाचे नियम पालुन आदर्श निर्माण केला आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *