अंधारी नदीवर मोठ्या पुलासाठी 8 कोटी 17 लक्ष रू निधीला मंजुरी

लोकदर्शन प्रतिनिधी : शिवाजी सेलोकर 

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर तालुक्यातील नागाळा येथील अंधारी नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम मंजूर झाले असून त्यासाठी 8 कोटी 17 लक्ष रू निधी मंजूर करण्यात आला आहे.

चंद्रपूर तालुक्यातील मरारसावरी ते नागाळा ग्रामीण मार्ग क्र. 64, किमी 1/300 मध्ये बारमाही वाहणाऱ्या अंधारी नदीस ओलांडतो. सदर ग्रामीण मार्गाचा वापर या परिसरातील शेतकरी, शाळकरी मुले व ग्रामस्थ करीत असतात. सद्यःस्थितीत अंधारी नदीवरील या क्रॉसिंगवर कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम अस्तित्वात नसल्यामुळे, रहदारीस अडथळा निर्माण होउन वाहतुकीस गैरसोय व्हायची त्यामुळे या परिसरातील नागरिकांची मागणी विचारात घेवून आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुलाच्या बांधकामा संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा व पत्रव्यवहार केला . त्याच प्रमाणे डिसेंबर-2020 च्या विधानसभा अधिवेशनात ताराकिंत प्रश्न सुद्धा उपस्थित केला होता.
सदर मागणीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर मार्गावरील अंधारी नदीवर पुलाचे बांधकाम नाबार्ड 25 योजने अंतर्गत मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला, त्यानुसार 105 मी. लांबीच्या पुलाचे बांधकामास नाबार्ड 25 योजनेमध्ये रु. 817.00 लक्ष किंमतीस मंजुरी प्राप्त झालेली आहे. सदर काम डिसेंबर-2020 च्या अर्थसंकल्पात समाविष्ट सुद्धा झाले असून सदर कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने या परिसरातील नागरिकांची मोठी समस्या दूर होण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *