दि 19 / 3/ 2021 शिवाजी सेलोकर
3 दिवसात 300 नागरीकांनी घेतला लाभ
गडचांदूर :-औद्योगिक शहर गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात कोविशिल्ड लसीकरण शुभारंभ 15 मार्च ला सकाळी 11 वाजता माजी नगरसेवक सतीश उपलेंचवार यांच्या हस्ते करण्यात आला, याप्रसंगी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य नगरसेवक राहुल उमरे,वैद्यकीय अधिक्षक डॉ, प्रशांत गेडाम,तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन नळे, नियंत्रक डॉ गोविंद गोणारे,नगरसेवक अरविंद डोहे, रामा मोरे,तथा इतर उपस्थित होते,
तालुक्यात सर्वप्रथम कोरपना येथे लसीकरण केंद्र सुरू केले आहे,मात्र गडचांदूर येथे लसीकरणाची सोय नसल्याने येथील नागरिकांना कोरपना येथे जाऊन लसीकरण करावे लागत होते. प्रचंड गैरसोय होत होती,तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर येथे तातडीने लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी भाजप ने आरोग्य प्रशासन कडे केली होती. खासदार बाळू धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांनी सुद्धा लक्ष वेधून गडचांदूर येथे केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती, त्या अनुषंगाने तातडीने गडचांदूर येथे लसीकरण केंद्र ग्रामीण रुग्णालयात 15 मार्च पासून सुरु करण्यात आले आहेत, पहिल्या च दिवशी 86 नागरिकांनी लसीकरण चा लाभ घेतला. 3 दिवसात 300 नागरिकांनी लसीकरण चा लाभ घेतला आहेत, जास्तीत जास्त नागरीकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालय च्या वतीने करण्यात येत आहे.
लसीकरण मोहीम राबविण्यासाठी नियंत्रक डॉ, गोविंद गोणारे,डाटा ऑपरेटर गजानन राठोड, किरण कोळसे,शुदधोधन धोंगडे,लक्ष्मण राठोड, तथा इतर परिश्रम घेत आहेत,
उद्घाटन समारंभचे संचालन व आभार प्रदर्शन रमेश राठोड यांनी केले.