दि. १२/०३/२०२१ मोहन भारती
गडचांदूर : –सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोरच्या खुल्या जागेवर जेष्ठ नागरिक सेवा संस्था, गडचांदूर च्या सभागृहाचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे,यांच्या हस्ते करण्यात आले,या सभागृहाच्या बांधकाम साठी आमदार स्थानिक विकास निधी 20 लक्ष मंजूर झाले आहे.याप्रसंगी आयोजित करण्यात आले ल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नगराध्यक्षा सविताताई टेकाम होत्या, प्रमुख अतिथी म्हणून राजुरा चे नगराध्यक्ष अरुण धोटे, पोलीस निरीक्षक गोपाल भारती, तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे,गटनेते विक्रम येरणे,नगरसेवक पापय्या पोन्नमवार,सागर ठाकुरवार, हंसराज चौधरी ,जेष्ठ नागरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष हरिश्चंद्र अरोरा,सचिव बाळासाहेब मोहितकर होते,
गडचांदूर शहराच्या तसेच परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार सुभाष धोटे यांनी याप्रसंगी सांगितले, उद्योगधंदे शहरात आल्यामुळेच शहराचा विकास झाला असे सांगितले,याप्रसंगी आमदार सुभाष धोटे व इतर मान्यवर चा सत्कार जेष्ठ नागरिक सेवा संस्थेचे च्या वतीने शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला,
प्रास्ताविक बाळासाहेब मोहितकर यांनी केले, संचालन पुरुषोत्तम निब्रड यांनी केले तर आभार प्रदर्शन तुळशीराम पुंजेकर यांनी केले.कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक सेवा संस्था चे पदाधिकारी व सदस्य तसेच इतर उपस्थित होते.