ब्रम्हपूरी क्षेत्रातील रस्ते, इमारत व पुलांच्या कामासाठी अर्थंसंकल्पात १७० कोटी रुपयांचा निधी मंजूर
ब्रम्हपुरी शहरातून जाणाऱ्या रेल्वे लाईनवर 75 कोटी रुपयांचा रेल्वे उडान पूल मंजूर
सिंदेवाही शहरामधून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे सिमेंट क्रांक्रीट, मजबुतीकरण, सुधारणाकरने यासाठी 20 कोटी मंजूर
मुंबई/चंद्रपूर – ब्रम्हपूरी क्षेत्रातील ब्रम्हपूरी, सावली आणि सिंदेवाही तालूक्यातील महत्वाचे रहदारी असलेले रस्ते नादुरूस्त असल्याने रहदारीस अयोग्य होते. या रस्त्याची राज्याचे मंत्री व या क्षेत्राचे आमदार विजय वडेटटीवार यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबधित अधिकारी याना दिले. शासन स्तरावर प्रस्ताव सादर होताच या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी व अर्थसंकल्पात समाविष्ट होण्यासाठी संबधित विभागास पत्रव्यवहार करुन अथक परिश्रम घेतले. त्यांच्या अथक परिश्रमाला यश आले असून नुकताच सादर करण्यात आलेल्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पात ब्रम्हप्ररी क्षेत्रातील ब्रम्हपूरी, सिंदेवाही व सावली तालूक्यातील रस्त्यांचे नुतनीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरणासह इमारतीचे बांधकाम पुलाचे बांधकाम करण्यासाठीच्या कामास प्रशासकीस मान्यतेसह १६९ कोटी ४४ लक्ष ५८ हजार रूपयांचे निधी मंजूर झाला. या निर्णयामूळे विकासपुरूष विजय वडेटटीवार मंत्री आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन] बहुजन कल्याण तथा पालकमंत्री चंद्रपूर सर्वत्र अभिनंदन होत आहे.
राज्याचे मंत्री विजय वडेटटीवार हे ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपूरी] सावली व सिंदेवाही तालूक्यातील सर्व गावांचा जनसंपर्क अभियानातंर्गत झंझावती दौरा करून गावातील अडिअडचणीबाबत दररोज हजारो नागरिकांसोबत चर्चा करीत होते. या दौऱ्याप्रसंगी रहदारीस अयोग्य आणि खराब असलेल्या रस्त्यांची नोंद आपल्या डायरीमध्ये करुन संबधित अधिका-यास शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यास सांगत होते. हे सर्व प्रस्ताव शासनाकडे सादर होताच निधीसह प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन मंजूर होण्यासाठी परिश्रम घेत होते. विजय वडेटटीवार यांच्या अथक परिश्रमाला यश आले असून नुकताच सादर करण्यात आलेल्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पात ब्रम्हपूरी तालूक्यातील ब्रम्हपूरी तालूक्यातील जाणा-या नागपूर ब्रम्हपूरी गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग ३५३ डी वरील किमी ११७/४०० मध्ये ब्रम्हपूरी शहरामधून जाणा-या रेल्वे क्रासिंगवर रेल्वे उडाण पुलाचे बांधकाम करणे ७५ कोटी रूपये, ब्रम्हपुरी तालुक्यातील अधिकारी व कर्मचा-यांसाठी ब्रम्हपूरी येथे टाईप १ व २ च्या निवासी इमारत बांधकाम करणे ९ कोटी ४६ लक्ष ४४ हजार रुपये ब्रम्हपुरी तालुक्यातील अधिकारी व कर्मचा-यांसाठी ब्रम्हपूरी येथे टाईप ३ व ४ च्या निवासी इमारत बांधकाम करणे ९ कोटी ५१ लक्ष ७३ हजार रुपये ब्रम्हपुरी तालुक्यातील अडयाळ हत्तीलेंडा दुधवाही ते ( राष्ट्रीय मार्ग ३५३ डी ) ते खेड कहाली खंडाळा नान्होरी दिघोरी तपाळ बेलगाव देउळगाव कोलारी रस्ता प्रजिमा-१२३ किमी ०/०० ते २१/२००, ( किमी ०/०० ते ६/००) मध्ये रस्त्याची सुधारणा व दोन वर्षाकरीता देखभाल दुरुस्ती करणे १ कोटी ५० लक्ष रुपये, ब्रम्हपुरी तालुक्यातील अडयाळ हत्तीलेंडा दुधवाही ते ( राष्ट्रीय मार्ग ३५३ डी ) ते खेड कहाली खंडाळा नान्होरी दिघोरी तपाळ बेलगाव देउळगाव कोलारी रस्ता प्रजिमा-१२३ किमी ०/०० ते २१/२००] किमी ८/५०० ते १४/५००) मध्ये रस्त्याची सुधारणा व दोन वर्षाकरीता देखभाल दुरुस्ती करणे ३ कोटी रुपये, ब्रम्हपूरी तालुक्यातील मालडांगरी चौगान जुगनाडा मुई गांगलवाडी रस्ता प्रजिमा-१२१ वर किमी ७/५०० वर मध्ये लहान पुलाची पुनर्बांधणी करणे २ कोटी १२ लक्ष ५८ हजार रुपये, ब्रम्हपूरी तालुक्यातील गांगलवाडी बरडकिन्ही रस्ता ग्रामा-१२७ वर किमी ०/९०० मध्ये लहान उंच पुलाची पुनर्बांधणी करणे १ कोटी ३१ लक्ष ८६ हजार रुपये सिंदेवाही तालूक्यातील अधिकारी व कर्मचा-यांसाठी सिंदेवाही येथे टाईप १] २] ३ व ४ च्या निवासी इमारत बांधकाम करणे ८ कोटी २३ लक्ष ९० हजार रुपये] सिंदेवाही तालुक्यातील नागपूर नागभीड सिंदेवाही मूल खेडी रस्ता प्ररामा -९ किमी १३०/०० ते १३२/२०० सिंदेवाही शहरातील मुख्य रस्त्याचे सिमेंट क्राँक्रीट रस्त्याचे चौपद्रीकरणसह बांधकाम करणे व रस्त्याची सुधारणा व दोन वर्षाकरीता देखभाल दुरुस्ती करणे २० कोटी रुपये] सिंदेवाही तालुक्यातील मुरमाडी कळमगाव कुकूडहेटी प्रजिमा-४६ किमी ३/०० उमा नदीवर मोठया पुलाचे बांधकाम करणे १५ कोटी रुपये, सिंदेवाही तालुक्यातील नागपूर नागभीड सिंदेवाही मुल खेडी रस्ता प्ररामा-९ येथे स्थानिक नाल्यावर किमी १३२/२०० उमा मध्ये पुलाचे बांधकाम करणे १ कोटी ५० लक्ष रुपये, सिंदेवाही तालुक्यातील नागपूर नागभीड सिंदेवाही मुल खेडी रस्ता प्ररामा-९ किमी १३४/०० ते १३५/०० आणि १३७/०० ते १३८/३०० मध्ये रस्त्याची सुधारणा व दोन वर्षाकरीता देखभाल दुरुस्ती करणे १ कोटी रुपये, सिंदेवाही तालुक्यातील पुलगाव देवळी हिंगणघाट वासी कोरा खडसंगी चिमूर नेरी सिंदेवाही आरमोरी रस्ता रामा-३२२ किमी १२२/०० ते १२२/८००] १३८/०० ते १४०/०० मध्ये रस्त्याची सुधारणा व दोन वर्षाकरीता देखभाल दुरुस्ती करणे २ कोटी २५ लक्ष रुपये] सिंदेवाही तालुक्यातील सावरघाट मारेगाव गुजेवाही पवनपार टेकरी रस्ता प्रजिमा-८० किमी ०/०० ते १२/८०० मध्ये रस्त्याची सुधारणा व दोन वर्षाकरीता देखभाल दुरुस्ती करणे २ कोटी रुपये] सावली तालुक्यातील अधिकारी व कर्मचा-यांसाठी सावली येथे टाईप २] ३ व ४ च्या निवासी इमारत बांधकाम करणे ११ कोटी २३ लक्ष ०७ हजार रुपये, सावली तालुक्यातील सिंदेवाही पाथरी मेहा निफंद्रा कोटगल रस्ता रामा-३७५ किमी ३३/९०० ते ३५/०० मध्ये रस्त्याची सुधारणा करणे व दोन वर्षाकरीता देखभाल दुरुस्ती करणे ८० लक्ष रुपये] सावली तालुक्यातील बोथली सावली सिर्सी हरंबा व्याहाड रस्ता प्रजिमा-२८ किमी ७/०० ते १०/०० मध्ये रस्त्याची सुधारणा करणे व दोन वर्षाकरीता देखभाल दुरुस्ती करणे १ कोटी ५० लक्ष रुपये] सावली तालुक्यातील बोथली सावली सिर्सी हरंबा व्याहाड रस्ता प्रजिमा-२८ किमी ३०/०० ते ३३/०० मध्ये रस्त्याची सुधारणा करणे व दोन वर्षाकरीता देखभाल दुरुस्ती करणे १ कोटी ५० लक्ष रुपये] सावली तालुक्यातील आकापूर करोली विहीरगाव निफंद्रा ते प्रजिमा-२९ रस्ता प्रजिमा-१२० किमी १५/०० ते १७/०० मध्ये रस्त्याची सुधारणा व दोन वर्षाकरीता देखभाल दुरुस्ती करणे १ कोटी रुपये] सावली तालुक्यातील बोथली सावली सिर्सी हरंबा व्याहाड रस्ता प्रजिमा-२८ किमी २२/४०० मध्ये उंच पुलाचे पुनर्बांधणी करणे १ कोटी ५० लक्ष रुपये अशा प्रकारे यावर्षीच्या नुकताच सादर करण्यात आलेल्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पात रस्त्यांची कामे समाविष्ट करून प्रशासकीय मान्यतेसह निधी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विजय वडेटटीवार यांनी आमच्या प्रतिनिधीसोबत बोलतांना म्हटले की मी या क्षेत्राचा आमदार म्हणून निवडून आलेला आहे. या क्षेत्रातील अविकास असलेल्या भागाचा विकास करणे हे माझ्यासमोर एक आव्हान होते. परंतू या क्षेत्राचा सर्वांगिन विकास करण्यासाठी पाच वर्षाचा कालबध्द कार्यक्रम तयार केला आहे. त्या दृष्टीने पत्रव्यवहार करून पाठपुरवठा सुरू केला. त्यात मला यश प्राप्त झाले. जे कामे मंजूर झालेत ते पुर्णत्वात आले असून काही कामे सुरू असून काही कामे निविदा प्रक्रियेत आहेत. या क्षेत्राचा सर्वांगिन विकास करणे हे माझे संकल्प असून त्यादृष्टीने विकासाच्या कामाची वाटचाल सुरू आहे असे त्यांनी म्हटले.