परभणी-भारतीय जनता पक्षाचे सेलू तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा परभणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय साडेगावकर यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह आज दिनांक ८ मार्च रोजी खा. संजय जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
परभणी शहरातील वसमत रोडवरील खा. संजय जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर शिवसेना पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर खा. संजय जाधव, जिल्हाप्रमुख विशाल कदम व सुरेश ढगे, शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रा. डॉ. पंढरीनाथ धोंडगे, राम खराबे, महिला आघाडीच्या सखुबाई लटपटे, युवासेनेचे जिल्हा अधिकारी दीपक बाराहाते, अर्जुन सामाले यांची उपस्थिती होती.
यावेळी संजय साडेगावकर यांच्यासोबत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन सोळंके, वालुरच्या माजी सरपंच सिंधुबाई कलाल, माजी सरपंच मोहम्मद हनिफ कुरेशी, माजी उपसरपंच शेख गणीभाई, व्यापारी शैलेश तोष्णीवाल, पं. स. सदस्य पांडुरंग रोकडे, भाजपाचे उपतालुका अध्यक्ष बंडू डख, माजी चेअरमन अंबादास भालेराव, ग्रा. पं. सदस्य सिद्धार्थ भालेराव, शिवाजी पांढरे, व्यापारी अमोल कलाल, रवी कलाल, सोन्नाचे सरपंच प्रल्हाद गायके, प्रसाद मगर, ग्रा. पं. सदस्य शेख समर, संतोष तळेकर, लाल खाँ पठाण, अशोक आंधळे, संतोष डोईफोडे, रामेश्वर गायके, बबन बोडखे, सिद्धराम धापसे, मुंजा पाटील भोगावकर, माजी उपसरपंच अंजाराम सोनवणे, रामभाऊ धापसे, रामप्रसाद बोराडे, माणिक शेळके, देविदास राठोड, चिंतामण दौंड, किसन बादाड, बाळासाहेब साखरे, किसन पितळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष शक्तीसिंह बोराडे, संतोष चोरमले, कुंडलिक पिसुरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
खा. संजय जाधव यांनी या सर्वांचे पुष्पहार आणि भगवा रुमाल घालून शिवसेनेत स्वागत केले. संजय साडेगावकर, जिल्हाप्रमुख सुरेश ढगे व विशाल कदम यांनी आपले विचार मांडले. यावेळी खा. जाधव म्हणाले की, राजकारण करणारे अनेक पक्ष आहेत. पण सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारा शिवसेना हा एकच पक्ष आहे. भविष्यातही अनेक जण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असे त्यांनी सांगितले. गाव तेथे शिवसेना शाखा आणि शिवसेनेचा फलक असे धोरण समोर ठेवून पदाधिकाऱ्यांनी यापुढे काम करावे, असेही खा. जाधव याप्रसंगी म्हणाले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. डॉ. पंढरीनाथ धोंडगे यांनी केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे, रवींद्र धर्मे, रणजित गजमल, बंडू लांडगे, दशरथ भोसले, सदाशिव देशमुख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राम शर्मा, अनिल सातपुते, मुंजाभाऊ कोल्हे, हनुमंतराव पौळ, भगवान पायघन, परभणी महानगर पालिकेतील शिवसेनेचे गटनेते अतुल सरोदे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमास जिल्हातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.