अल्ट्राटेक सिमेंट कंपनीविरोधातील भाजपाच्या आंदोलनाला यश

By : Shankar Tadas
कोरपना / नांदा :

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने आजुबाजुच्या गावांना दत्तक घेतले असुन त्या गावांच्या समस्या सोडविणे हे कंपनी प्रशासनाचे कर्तव्य आहे. परंतु काही वर्षापासून कंपनी प्रशासन या मुद्याकडे दुर्लक्ष करीत आहे. जनतेचे अनेक प्रश्न तसेच मागण्या आहेत ज्या कंपनी प्रशासनाला सहज पूर्ण करण्याजोगे असताना सुध्दा कंपनी प्रशासनांनी अजुन पर्यंत त्याची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे कंपनीच्या हेकेखोर धोरणाविरोधात राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांचा मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी व दत्तक गावातील नागरीक यांनी कंपनीच्या नांदा प्रवेशद्वारा जवळ रविवारी, १६ मार्चला केलेले आंदोलन यशस्वी झाले आहे. खालील प्रमाणे मागण्या यावेळी केल्या त्यापैकी बहुतेक मान्य करण्यात आल्या आहे.

१. पोलीस स्टेशन ते नथ्थु कॉलोनी पर्यत रोड वरती डस्टची सफाई करुन दररोज सकाळ संध्याकाळ दोन वेळा पाणी मारणे.
२. नांदा ते आजु बाजुच्या परिसरात कंपनीच्या डस्ट पासून वायु प्रदुषण होत आहे या वरती उपाय योजना करावी
३. नांदा गेट समोरिल झंडया जवळ लोडेड वाहनामुळे रोड गुळगुळीत होऊन दुचाकी स्वारांचे गाडी
घसरून अपघात होतात,त्यामुळे रोड वरती नव्याने कॉक्रेट टाकणे.
४. उर्वरित लोडर भरती त्वरीत सुरु करुन स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यात यावे.
५. कंपनीच्या वायु प्रदुषनामुळे परिसरातील शेतक-यांचे (पीकांचे) फार मोठे नुकसान होत असते. त्या करिता शेतक-यांना
नुकसान भरपाई म्हणुन हेक्टरी ५००००/ – रु देण्यात यावे.
६. अल्ट्राटेक कंपनी मधुन ओ्हरलोडेड वाहनाच्या वाहतुकीमुळे रस्त्याची दुरावस्था होत आहे त्यामुळे ओव्हरलोड
वाहनावरती जासन प्रशासन व कंपनी प्रशासनांनी अशी वाहतुक थांबविण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावी
७. सीएसआर फंडातुन दृत्तकगावातील डेतक-यांच्चा शेतीत जाणा-या पांदन रस्त्याचे काम प्राधाण्याने करण्यात यावे.
तसेच सीएसआर फंडातील विवीध योजनाचा लाभ दत्तक नावातील लोकांना देण्यात यावा व त्याची माहीती गावातील सर्व चावडीवर लावण्यात यावी,
८. दत्तक गावातील आय टी आय तसेच विवीध पदवीधर युवकांना कंपनीच्या होणा-या नौकर भरतीत प्राधाण्याने संधी देण्यात यावी.

या पार्श्वभूमीवर काही तास नांदा फाटा गेट वर्दळ बंद करण्यात आली होती सिमेंट कंपनी मध्ये जाणारा गेट काही काळ बंद करण्यात आला होता. याची दक्षता घेत कंपनी प्रशासनाने लिखित स्वरूपात मागण्या मान्य करण्या करिता बैठक बोलवली. त्या मध्ये येत्या एक – दोन दिवसात कंपनी प्रशासन कामाला सुरूवात करणार असून उर्वरित मागण्या सदर्भात कंपनी प्रशासन कटीबद्ध असल्याचे लेखी देण्यात आले.

यावेळी तालुक्याचे अध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, आदिवासी मोर्चा भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मडावी, नांदा शहर अध्यक्ष संजय नित, गडचांदूर शहर अध्यक्ष अरुण डोहे, महामंत्री प्रमोद कोडापे, विजय रणदिवे, निखिल भोंगळे, विशाल अहिरकर, रवी बंडीवार, गडचंदूर माजी नगराध्यक्ष विजया लक्ष्मी डोहे, विरुरु येथील सरपंचा तेजस्विनी झाडे, संगीता मुसळे यांचा उपस्थितीत कंपनी प्रशासनाने मागण्या मान्य करण्यात आल्याची लेखी दिली.
प्रसंगी आंदोलनात भाजपा महिला मोर्चा, युवा मोर्चा, कार्यकर्ते, पदाधिकारी, व गावातील नागरीक उपस्थित होते.

****
आंदोलना दरम्यान कंपनी प्रशासनाने आम्हाला बोलावून काही मागण्या संदर्भात चर्चा करून लेखी दिल्या. तर काही मागण्या नेहमीच काम करीत असल्याने त्या करिता कठीबद्ध असल्याचे बतावणी केली. त्यामुळे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले परंतू कंपनी प्रशासनाने मागण्याची पूर्तता न केल्यास पुन्हा जन आंदोलन करण्याचा इशारा दिला : संजय मुसळे भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here